Home यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात “वसुलीबाज” वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धुमाकूळ…

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात “वसुलीबाज” वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा धुमाकूळ…

367

यवतमाळ – वणी येथील वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप करून त्याची तक्रार नुकतीच माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील या तक्रारीतून करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका हा मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक आणि मोठी बाजारपेठ असल्याने आर्थिक उलाढाली साठी प्रसिद्ध आहे. अशातच वनी शहरात वाहतूक विभागामार्फत ” वसुली” ची नवीन मोहीम राबविली जात असल्याची धक्कादायक प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे. वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वाहतूक विभागाचे कर्मचारी थेट चंद्रपूर जिल्ह्यात वसुली करण्यास जाऊन पोहोचले आहे. एवढेच नव्हे तर वणी शहरात कार्यरत असलेल्या विविध खाजगी वाहतूक कंपनीमध्ये जाऊन ओव्हरलोडिंग ला प्राधान्य देत त्यांच्याकडून प्रत्येक ट्रक मागे 1500/- रुपये व नको तसा पैसा वसूल केला जात आहे. वणी शहरातून होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतूक मधील पैशाची वसुली करण्याकरिता दोन पित्तू देखील पोचून ठेवले गेले आहे व त्यांच्यामार्फत रेतीच्या प्रत्येक ट्रक कडून रु. 2000/- इतके वसूल केल्या जातात. याशिवाय खात्यातील गोपनीय माहिती देखील बाहेर पुरविल्या जाते. अनेक अवैध धंद्याना प्राधान्य देऊन हे अधिकारी व कर्मचारी मस्त “माया ” गोळा करण्यात व्यस्त झाले आहे. हे अधिकारी व कर्मचारी कोण? अशा भ्रष्ट कर्म अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित का करत नाही? अशी ओरड सामान्य जनतेच्या माध्यमातून होत आहे.

क्रमश