Home यवतमाळ पांढरकवडा येथील आर.टी.आय कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांचा भ्रष्टाचार विरुद्ध लढ़ा सुरुच राहील...

पांढरकवडा येथील आर.टी.आय कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांचा भ्रष्टाचार विरुद्ध लढ़ा सुरुच राहील जीवितवास धोका कायम

144

यवतमाळ (प्रतिनिधी )  – पांढरकवडा येथील रजनीकांत डालूराम बोरेले हे एक अद्वितीय आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहेत, जे त्यांच्या मानवतावादी विचारसरणी, आध्यात्मिकता आणि समाजासाठीच्या समर्पणासाठी ओळखले जातात. त्यांनी आपली जीवन यात्रा मानवकल्याण आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पित केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यांसाठी आणि योगदानासाठी त्यांना प्रतिष्ठित जिंदाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, हा पुरस्कार माजी राष्ट्रीपती अब्दुल कलाम, माजी न्यायमूर्ति संतोष हेगड़े सुप्रीम कोर्ट, जेष्ट समाज सेवक अण्णाजी हजारे यांच्या सोबत जिंदल पुरस्कार एकाच वेळी मिळाला आहे. त्यांच्या कार्य व परिश्रम आणि समर्पण समाजा साठी प्रेणादायी आहे.
रजनीकांत बोरेले हे आर.टी.आय कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर म्हणून देखील ओळखले जातात. सत्य आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे साहसिक कार्य केले आहे. न्याय आणि समानतेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी त्यांचा आवाज आशेचा किरण आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य, गरिब – गरजूंच्या मदती सारख्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांची आध्यात्मिकता आणि मानवतावाद त्यांना खऱ्या अर्थाने एक देवदूत ठरवतात. त्यांची प्रेरणादायी जीवनकथा त्यांच्या समकालीनांना नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देतील.
एक व्यक्ती आपल्या विचारसरणी आणि कृतींनी व स्वबळा वर समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो.
त्यांचे जीवन हे जिवंत उदाहरण आहे की निःस्वार्थ सेवा, धाडस आणि सत्याच्या प्रति अढळ राहून एक व्यक्ती समाजाला नवी दिशा देऊ शकतो. अशा महान व्यक्तिमत्त्वा विषयी माहिती शेअर करणे हे आमच्यासाठी सुद्धा देखील गौरवाची बाब आहे. रजनीकांत बोरेले यांचे जीवन आणि त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणेचा स्रोत राहतील.
समाजात अनेक लोक त्यांचे उपकार देखील मानतात त्यांचे सामाजिक कार्य खुप दूर – दूर पर्यंत आहे
दुख:ची बाब ही आहे की, रजनीकांत बोरेले यांचे सारखे व्यक्ति समाजात खुप कमी असतात परंतु त्यांचे परउपकारी कार्याची दखल शासन किंवा समाज आज पावेते घेतली गेली नाही.
त्यांनी पोलीस अधीक्षक आणि इतर विभागाचे गैर प्रकार बाहेर काढले आहे. त्यांच्या विरुद्ध अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. अनेकां विरुद्ध कार्यवाही पण झाल्या आहे.
त्या मुळे पोलिस विभाग चिडून जावून त्यांना दिलेली पोलीस सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांचे अग्नि शास्त्र परवाना सुद्धा रद्द केला आहे.
रजनीकांत बोरेले यांनी अनेक शासकीय योजना आणि खाजगी व्यावसायिक राजकीय नेत्यांन विरुद्ध याचिका दाखिल केली आहे. ब-याच याचिका मध्ये उच्च न्यायालयाने रजनीकांत बोरेले यांच्या बाजूने निर्णय पारीत केला आहे. अनेक याचिका न्यायालयात न्याय निर्णया करीता सुरू असून प्रलंबित आहे. रजनीकांत बोरेले यांनी अनेकांचे भ्रष्टाचार याचिका दाखिल करुण कार्यवाही केल्या आहे.
त्यांचे सामाजिक आणि गैर प्रकार उघडकीस आनल्याने आणि त्यांचे कायदेशीर कार्य सुरु असून पुढे सुद्धा सुरुच राहणार आहे.
त्यांच्या कार्या मुळे त्यांच्या वर हल्ले करणे, जीवाने मारण्याचे धमक्या देणे अश्या अनेक घटना घडलेल्या आहे.
परंतु पोलीस प्रशासना आणि जिल्हाधिकारी विरुद्ध अनेक तक्रार व याचिका दाखिल केल्या मुळे त्यांच्या जीवित्वास खरोखर धोका असून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. उलट रिपोर्ट घेत नाही रिपोर्ट घेतला तर एन. सी. आर. केल्या जातात. दखलपात्र एफ. आय. आर. दाखल झाली तर न्यायालयात “ब” समरी फायनल पोलीस विभाग न्यायालयात सादर करतात. ही खुप मोठी शोकांतिका आहे.
महत्वाची बाब म्हणजे रजनीकांत बोरेले यांनी लोक सभा निवळनुकच्या वेळी देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात सभा घेतील होती ती सभा फार मोठी झाली होती.सभेत मोदी यांच्या व्हिजन आणि देश – विदेश नीति बद्दल उत्कृष्ट भाषण दिला होता.त्या मुळे त्यांना मोदी यांचा प्रचार आणि त्यांच्या समर्थनात सभा घेतली म्हणून रजनीकांत बोरेले व त्यांच्या कुटुंबास जीवितवाने मारून टाकण्याची धमकी आली होती.
पोलीस स्टेशन ला गुन्हा देखील दाखल झाला होता. मोदी यांच्या कळे तक्रार दाखिल केली होती परंतु दुखाची बाब ही आहे की मोदी यांनी काहीच कार्यवाही केली नाही.
अली कळेच दारू तस्करी आणि आमदार विरुद्ध तक्रार दाखल करुण आवाज उठविला आहे. त्यांनी अनेकांचे गैर प्रकार उघड़किस केल्या मुळे साहजिक बाब आहे त्यांच्या जीवा ला धोका आहे.
यांचे समाजा साठी केलेला संघर्ष आणि विविध क्षेत्रात केलेली उत्कृष्ट कार्याची दाखल घेवून शासनाने मोठ्या पदा वर घेवू सन्मान करावे जेने करुण त्यांचे कार्याचे आणि ज्ञान व लाभ शासन आणि समाजातील सर्व घटकातील महिला व पुरुषांना यांना होईल. सेवटी रजनीकांत बोरेले सारखे वेक्तिकेंद्र आणि राज्य शाशनाच्या साठी व्हिसल ब्लोअर, सामाजिक कार्यकर्ते,आर. टी. आय. कार्यकर्ते नाही तर शाशन साठी व्हिसल ब्लोअर, सामाजिक कार्यकर्ते कौन आहे हा संशोधनाचा विषय ठरला आहे. हे विशेष.