Home यवतमाळ पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये योग्य भूमिका पार पाडावी. -आ.प्रा.राजू तोडसाम

पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये योग्य भूमिका पार पाडावी. -आ.प्रा.राजू तोडसाम

412

घाटंजीत पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम.
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
लोकशाही मध्ये पत्रकारिता करून पत्रकाराने नेहमी चांगल्या गोष्टीला प्रसिध्दी देवून चुकीच्या ध्येय धोरणाच्या बाबतीत मात्र दक्ष राहून प्रसिध्दीतून पुढे आणावेत आणि लोकहिताचे लोकशाहीचे आणि राष्ट्रहिताचे प्रश्न विचारून पत्रकारितेमध्ये योग्य भूमिका पार पाडावी असे आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी मराठी पत्रकारितेचे पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दोन्ही पत्रकार संघटनेने सयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन जय स्तंभ चौकात करण्यात आले होते. यात सकाळच्या सत्रातील रक्तदान शिबिरात घाटंजी तहसीलदार विजय साळवे,पत्रकार बांधवासह मान्यवर रक्तदात्यानी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केले.सायंकाळच्या सत्रात सत्कार सोहळा व बाल कीर्तनकार ह.भ. प.माऊली महाराज जाहुरकर यांचा समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. ए. शहजाद,प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती आ. प्रा.राजू तोडसाम,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन कोठारी, उपसभापती सचिन देशमुख पारवेकर,तहसीलदार विजय साळवे,घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे,पारवा गजानन राठोड, वीजवितरण चे उपविभागीय अभियंता श्यामसुंदर कुऱ्हा, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश डहाके,गिरीश बोरकर आदींची उपस्थिती होती.यावेळी आ. तोडसाम यांनी पत्रकार भवन देण्याचे आश्वासन देत विस्तृत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एम. ए. शहजाद,गिरीश बोरकर, श्यामसुंदर कुर्हा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याचवेळी घाटंजी तालुक्यात पत्रकारिता करणारे व नुकतेच तलाठी म्हणून महागाव तालुक्यात नुकतेच रुजू झालेले पांडूरंग निवल यांचा सपत्नीक सत्कार,दैनिक नागपूर पोष्टचे तालुका प्रतिनिधी प्रदीप वाकपैजन यांच्या दोन्ही मुलींनी वैद्यकीय क्षेत्रात झेप घेतल्याने पालक म्हणून त्यांचा सपत्नीक सत्कार याशिवाय आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महिलांची साडीचोळी देवून तर प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी मरणाऱ्यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला.
या स्तुत्य कार्यक्रमात बालकीर्तनकाराने श्रोत्यांना भारावून सोडले.यावेळी पत्रकार महेंद्र देवतळे यांनी पत्रकारांच्या पटलावर प्रकाश टाकत विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कोरवते यांनी तर सूत्र संचालन रुपेश कावलकर तर आभार गणेश भोयर यांनी मानले.या कार्यक्रमाला विठ्ठल कांबळे,चंद्रकांत ढवळे, बाळ ठाकरे,राजू चव्हाण,अनंत नखाते, संतोष अक्कलवार, दीनेश गाऊत्रे,विलास महलले,बंडू तोडसाम,सागर संम्मनवार,आकाश बुर्रेवार,संजय ढवळे, सुधाकर अक्कलवार,अरविंद चौधरी,संतोष पोटपिल्लेवार,अरुण कांबळे,शेखर पलकंडवार,सचिन कर्णेवार,अरविंद जाधव, कज्जुम कुरेशी,अमोल मोतेललवार, जितेन्द्र जूनघरे,ओम ढवळे,मुकेश चिव्हाने,प्रदीप वाकपैजन,नंदकिशोर डंभारे,अमोल नडपेलवार,कुणाल तांगडे,दिनेश नडपेलवार, फरहान मुसानी,प्रेम चव्हाण,मुज्जू पटेल, अमोल कावळे यांचे सह अनेकांची उपस्थिती होती.