Home मराठवाडा लेक शिकली पूर्ण कुटूंब शिकते – शिवशंकर लिंगायत

लेक शिकली पूर्ण कुटूंब शिकते – शिवशंकर लिंगायत

227

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. ४ :- दरेगाव मुदखेड येथे मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना जनतेच्या दारी हा कार्यक्रम दरेगाव चे पोस्ट मास्तर श्री.प्रभाकर गाढे यांनी आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून नागरिकांना मार्गदर्शन करताना मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर लिंगायत म्हणाले की घरातील मुलगी शिकली तर पुऱ्या कुंटुबाला शिकवते मुलीच्या शिक्षणासाठी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेचा लाभ मुलींच्या आई व वडिलांनी घ्यावा.
असे आपल्या भाषणात बोलत होते.
या कार्यक्रमाला दरेगाव येथील प्रथम नागरिक सरपंच सो. गंगाबाई नारायण राहेरे हे उपस्थित होते तर साह्ययक डाक आधीक्षक श्री.संजय आबेकर व नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस चे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह श्री.सुरेश सिंगेवार हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डाक अधीक्षक म्हणाले की दररोज कुठे ना कुठे खोट्या योजना येतात दोन वर्षात दुपटीने पैशे करून देतो म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना खोटे बोलवून पैसे घेऊन जातात आशा व्यक्ती पासून सावधगिरी बाळगली पाहिजे डाक विभाग वर्षे न वर्ष आपल्या गावात सेवा देत आहे आज पण पोस्ट ऑफिस वर नागरिकांचा मोठा विश्वास आहे.म्हणून भारत सरकारने पोस्ट ऑफिस मध्ये जनसामान्यांना लोकांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जनकल्याण योजना पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय आबेकर पोस्ट ऑफिस मध्ये पुर्वी पत्र वाटपाचे काम होते ते आता राहिले नाही तर पोस्ट ऑफिस मध्ये बँकेच्या तुलनेत कीती तरी पटीने चांगल्या व मोठ्या व्याज देणाऱ्या योजना पोस्टात आहेत नागरिकांना ही माहिती होण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी या योजना लाभ घ्यावा असे सांगितले.तर मार्केटिंग एक्सिकेटीव्ह नांदेड सुरेश सिंगेवार म्हणाले की महिलांना शशक्तीकरणासाठी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक मुलीच्या आई व वडिलांचे स्वप्नन मुलगी शिकून आधिकारी व्हावी असे आई व वडिलांना वाटते हे साकार करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजना चा लाभ घ्यावा असे सिंगेवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रभाकर गाढे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन सुर्यतले यांनी केले.