Home पालघर आदिवासी प्रीमियर लीग मोख्या चापाडा 8 मार्च ते 9 मार्च दोन दिवसीय...

आदिवासी प्रीमियर लीग मोख्या चापाडा 8 मार्च ते 9 मार्च दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा चे आयोजन

77

जव्हार – सोमनाथ टोकरे 

जव्हार तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या कौलाळे ग्रामपंचायत पैकी( मोख्या चापाडा) या गावात दिनांक : 8मार्च ते 9 मार्च 2023 रोजी किरकिरे क्रीडांगण मोख्याचा पाडा मैदान क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 च्या सुमारास सदर M.P. L क्रिकेट लीग चे उदघाटन हे मोठया आनंदमय वातावरणात पार पडले, उदघाटन कार्यक्रम प्रसंगी कौलाळे ग्रामपंचायत चे विद्यमान प्रमुख उदघाटक कर्तव्यदक्ष सरपंच श्रीमती वैशाली अशोक धोडी, माजी उपसभापती श्री. चंद्रकांत रंधा साहेब, केशव टोकरे माजी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच शंकर मेढा, माजी सरपंच सुभाष मूर थडे, कुणाल सर, हस्ते उदघाटन करण्यात आले.
ही स्पर्धा गेल्या दोन वर्षापासून मोख्याचा पाडा गावा मिळून मोठे उत्साह मध्ये क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते . या भागामध्ये एकोपाची भावना कायम राहावी, एकमेकांचे मतभेद विसरून या स्पर्धेमध्ये एकत्र यावे यास्पर्धेचाआनंदलुटला पाहिजे गावातील पोरांनी विकास कामासाठी देखील एकत्र आले* *पाहिजे .कौलाळे .ग्रा.माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. केशव टोकरे आणि उपसभापती चंद्रकांत रंधा साहेब यावेळी बोलताना सांगितले. तसेच या क्रिकेट स्पर्धा लीगला विशेष सहकार्य कासट वाडी. ग्राम. सरपंच श्री. कल्पेश राऊत साहेब यांच्या कडून प्रथम क्रमांक चे बक्षीस 5000 हजार,प्रदीप पागी साहेब 1000, रघुनाथ चौधरी मेजर 1000 हजार रुपये , वैशाली धोडी सरपंच कौलाळे 2000 हजार रुपये . ग्राम. केशव टोकरे मा.सदस्य, पांडुरंग पागी (मंडप डेकोरेशन ) चंद्रकांत टोके 1000 हजार रुपये , दीपक पागी 500 रुपये, शंकर मेढा उपसरपंच 1000 हजार रुपये, आणि इतरही मान्यवरांनी विशेष सहकार्य केलं आहे, त्यासर्वांचे कमिटीच्या वतीने आयोजक यांनी आभार मानले.
लीग यशस्वी करण्यासाठी मागील एक महिन्यापासून मेहनत घेतली ते प्रेमचंद टोकरे, मनोज गरेल,अंकुश गरेल महेंद्र टोकरे, नयन पागी, विशाल गरेल,जगदीश टोके, चेतन, मदन टोकरे, सुनिल गरेल,आयोजक गावच्या मुलांनी मैदान करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.तसेच गावातील जेष्ठ नागरिक, खेळाडू, लहान मुले मोठया संख्याने उपस्थित होते.