Home रायगड कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये Milan laboratories (india) pvt. Ltd च्या...

कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये Milan laboratories (india) pvt. Ltd च्या सौजन्याने आधुनिक गार्डनचे उदघाटन

52
पनवेल – गिरीश भोपी
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद्य असणारे रयत शिक्षण संस्थेचे कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शुक्रवार दिनांक २४/०२/२०२३ Milan laboratories (india) pvt. Ltd यांच्या सौजन्याने विदयालयात तयार केलेल्या आधुनिक गार्डनचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाला Milan laboratories च्या डायरेक्टर सौ. रोहिनी डोंगरे मॅडम, मा.श्री.उपेंद्र देशपांडे सर डायरेक्टर , आणि मा.सौ. मेघ हजिरणीस ,मा. श्री. विनोद तारेकर ठाणे उपटाऊन रोटरी क्लब चे अध्यक्ष मा. सौ. ललिता अरगेकर मॅडम आणि मा. उल्हास अरगेकर, मा. श्री.लक्ष्मण भोपी,मा. श्री. रुत्विच डोंगरे, अभिलाष पिल्ले स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्री जयदास गोवारी, व्हॉईस चेअरमन श्री. विनायक म्हात्रे मुख्याध्यापक श्री. चालके सर, माजी चेअरमन स्वामी म्हात्रे, बालाराम चिपलेकर सदस्य विनायक गोवारी आणि शाळेतील विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. राहुल चिपलेकर आणि अनिल पाटील यांनी केले. या वेळेस गार्डन मधील बसलेल्या खेळण्याचा मुलांनी आनंद घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.