Home जळगाव अखेर आश्रमशाळेतील शिक्षकाला मिळाला न्याय

अखेर आश्रमशाळेतील शिक्षकाला मिळाला न्याय

82

शाळा न्यायधिकरणाची संस्था चालकाला चपराक.

शाळा न्यायाधिकरणाने संस्थेला दिले रसलपूर आश्रमशाळेच्या शिक्षकाला पुर्नस्थापित करून वेतन देण्याचे आदेश.

रावेर (शेख शरीफ)
रावेर येथील कै. पांडुरंग तोताराम पाटीत शिक्षण संस्थेच्या माजी आमदार अरुण पाटील यांच्या रसलपूर येथील आश्रमशाळेत कार्यरत प्रकाश पाटील या शिक्षकाची सन २०१२ ला बेकायदेशीर पणे शिक्षक पदाची सेवा समाप्त केली होती. संस्थेच्या अशा मनमानी कारभाराच्या विरोधात या शिक्षकाने शाळान्यायाधिरण नाशिक येथे दाद मागीतली होती. शाळा न्यायाधिकरण नाशिक येथील न्यायालयाने प्रकाश पाटील यांना शिक्षक पदावर संस्थेने ४० दिवसात हजर करून त्यांना सन २०१२ पासूनचे सूपूर्ण वेतन संस्थेने अदा करण्याचे नुकतेच आदेश देवून संस्थेला चपराक दिली आहे. यामुळे पिडीत शिक्षकाच्या १० वर्षाच्या लढ्याला यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्त असे की रसलपूर येथील आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत प्रकाश पाटील यांनी आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या संस्था अध्यक्षांच्या नातेवाईक कर्मचार्‍याची मनमानी, शासनाची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यात संस्था चालकाचा चुलतभाऊ प्रभाकर पाटील यांनी पत्राद्वारा डी. एड. करतांना शाळेच्या दप्तरात खाडाखोड करून खोटी माहीती सादर करून प्रवेश मिळवला होता. तक्रारी मुळे त्यांचा डी एड प्रवेश रद्द झाला असून औरंगाबाद उच्च न्यायालयात दावा सूरु आहे. तसेच संस्था अध्यक्षांची मामेबहीण रेखा प्रभाकर पाटील यांची पत्नी रेखा पाटील यांनी ओ. बी. सी. संवर्गात नसताना बेकायदेशीर मिळविलेल्या जातीच्या दाखल्यावर स्वयंपाकी पदावर नोकरी मिळवली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून जातीचा दाखला रद्द होवून त्यांना स्वयंपाकी पदावरून आपली नोकरी गमवावी लागली. या प्रकरणी संस्था अध्यक्ष माजी आमदार अरुण पाटील, त्यांचे चुलतभाऊ शिक्षक प्रभाकर पाटील आणि प्रभाकर पाटील यांची पत्नी स्वयंपाकी रेखा पाटील या तिघांवर रावेर न्यायालयात शासनाची फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षक प्रकाश पाटील यांनी संस्था अध्यक्षांच्या नातेवाईकांच्या विरोधात केलेल्या तक्रारी केल्या होत्या. त्याचा संस्था चालकांना राग येवून त्यांनी त्यांची सन २०१२ ला बेकायदेशीर पणे त्यांची सेवा समाप्त केली होती. त्या प्रकरणाचा शाळा न्यायाधिकरणाने काही दिवसापूर्वी निकाल दिला त्यात न्यायालयाने निरिक्षण नोंदवत संस्था अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत या प्रकरणात संस्था अध्यक्षच तक्रारदार आणि न्यायाधिश झाले असून ते कायद्याला धरून नसल्याचे गंभीर निष्कर्ष नोंदविले असून प्रकाश पाटील यांचेवर सेवा समाप्तीची कारवाई बेकायदेशीर ठरवत शिक्षक प्रकाश पाटील यांना ४० दिवसात शिक्षक पदावर हजर करून त्यांचे सन २०१२ पासूनचे संपूर्ण वेतन संस्थेने अदा करण्याचे आदेश दिल्याने संस्थेच्या कार्यपद्धती ला चपराक बसेल असा निर्णय शाळा न्यायाधिकरणाचे न्यायमुर्ती संतोष गरड यांनी दिल्याने तक्रारदार शिक्षकाला दिलासा मिळाला आहे. शिक्षक प्रकाश पाटील यांचे वतीने अॅड महेंद्र भावसार यांनी काम पाहीले.