Home मुंबई शौर्य महायात्रा २०२० कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फूड अँड ड्रग्स कँझुमर वेल्फेअर कमिटीचे...

शौर्य महायात्रा २०२० कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फूड अँड ड्रग्स कँझुमर वेल्फेअर कमिटीचे आवाहन.

158

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. २४ :- येत्या २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शौर्य महायात्रा २०२० चे आयोजन करण्यात आले असून या महायात्रा रॅलीत तब्बल १५५१ फूट लांब प्लॅगमार्च करण्यात येणार आहे.हिंदुस्तानात प्रथमच “अन्न सुरक्षा आणि ग्राहक हक्क जनजागृती “साठी बोध तथा उद्देशीय रॅलीचा होत असून ,यात सुमारे १० हजार लोक सहभागी होणार असल्याची माहिती फूड अँड ड्रग्स कँझुमर वेल्फेअर कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस जयवंत हनुमंत दामगुडे यांनी दिली आहे.शौर्य महायात्रा २०२० रॅलीत तब्बल १५५१ फूट लांब प्लॅगमार्च कार्यक्रम मोठ्या भव्यदिव्य जल्लोशात राष्ट्रगीत धून वाजवत घाटकोपर उड्डाणपूल पूर्व द्रुतगती महामार्ग येथून ठीक सकाळी ०९:३० वाजता सुरू होईल आणि दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे रॅलीची सांगता होणार आहे.या ऐतिहासिक सुवर्ण सोहळ्यात सहभागी होऊन साक्षी बनण्याचे आणि राष्ट्रीय अभिमान उराशी बाळगण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .

નમસ્કાર મિત્રો, મુંબઈ તથા મહારાષ્ટ્ર ના ઈતિહાસમાં સૌ પ્રથમ વખત યોજાનાર ઐતિહાસિક શૌર્ય મહાયાત્રા-2020 ના ભાગ રૂપે ગુજરાત રાજ્ય ના રાજ્યપાલ શ્રી માનનીય આચાર્ય દેવવ્રત સાહેબ સાથે શુભેચ્છા મુલાકાત થઈ.

आवाहन जयवंत हनुमंत दामगुडे यांनी केले आहे.शौर्य महायात्रा २०२० रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी, लेझीम गट,एनसीसी कॉडेटस,स्काऊट अँड गाई गट,मुंबई डबावाला असोसिएशन, रोड सेफ्टी पेट्रोल ऑर्गनायझेशन, मुंबई पेपरवाला, आदिवासी, मच्छिमार,वारकरी संप्रदाय, शेतकरी,खेळपट्टू, कलाकार,सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते या रॅलीत सहभागी होणार आहेत.त्याचप्रमाणे १००पेक्षा जास्त सामाजिक संघटनांनी या रॅलीला पाठींबा दिला आहे.