Home मराठवाडा आयरिश टेक्नॉलॉजीच्या साह्ययने उघडले निराधार लाभार्थीचे पोस्ट बँकेचे खाते

आयरिश टेक्नॉलॉजीच्या साह्ययने उघडले निराधार लाभार्थीचे पोस्ट बँकेचे खाते

114

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड / किनवट , दि.२४ :- रोजी डाक अधीक्षक नांदेड यांच्या नांदेड डाक टीम ने आज मा. तहसीलदार श्री. नरेंद्र देशमुख यांची डाक निरीक्षक किनवट श्री.अभिनव सिन्हा व इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. स्वप्नील सावंत आणि मार्केटिंग एक्सिकेटीव्ह मुख्य पोस्ट ऑफिस नांदेडचे श्री. सुरेश सिंगेवार यांनी सदिच्छा भेट घेऊन संजय गांधी निराधार योजनाच्या लाभार्थी यांच्या खाते संबधी चर्चा करण्यात आली.

डाक निरीक्षक किनवट यांनी किनवट तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी एकूण चार हजार आहेत त्या पैकी ७१% खाते उघडण्यात आले आहेत काही निराधार लाभार्थीचे हाताचे ठसे न आल्याने आशा लाभार्थीत्यासाठी अत्याधुनिक आयरीस टेक्नॉलॉजी च्या साह्याने संजय गांधी निराधार योजना लाभार्थी श्रीमती, आखतारी बी शेख सलीम या महिलांचे किनवट तहसीलदार साहेब यांच्या समक्ष इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते त्वरित उघडून डिजीटल पास बुक देण्यात आले आहे.