Home विदर्भ “शिदोरी शिक्षणाची”या मराठी लघु चित्रपटाची निर्मिती.!

“शिदोरी शिक्षणाची”या मराठी लघु चित्रपटाची निर्मिती.!

82
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २४ :- जिल्ह्याच्या नजीकच्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात कावली गावामध्ये शिदोरी शिक्षणाची लघुचित्रपटाचे चिञीकरण करण्यात आले. या चित्रपटात ग्रामीण भागातील कलाकार मंडळींना मुख्यतः समाविष्ट करून घेतले आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शिक्षणा विषयी असलेली आई वडिलांची भूमिका यात विषद केलेली आहे.या चित्रपटाची कथा व दिग्दर्शक अभिषेख नायडू व राहुल कोलते आहेत.

या लघुचित्रपटाच्या चिञीकरणा बाबत आपण सकारात्मक समाधानी असल्याचे दिग्दर्शक अभिषेख नायडू यांनी सागितले.
तर चित्रपटाची निर्मिती निखिल मानकर आस्था डिजिटल कावली यांनी केली. मुख्य कलाकार-सुसंगत टाले,स्नेहल नेवारे,सुनील थुल,प्रणिता थुल,प्रा.निलेश मोहकार, विलास हेंडवे,मोहन लोंदे,प्रशांत डहाके,अनिल घोडे,किशोर डेरे हे आहे.या चित्रपटाचा मुख्य उद्देश-समाजामद्ये शिक्षणाचा प्रसार करणे.म.फुलेंनी म्हटल्याप्रमाणे “ज्योतीने ज्योत लावा एक निरक्षर साक्षर करा”.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामद्ये उल्लेख केलेल्या अनुच्छेदानुसार मुलभूत हक्क,मार्गदर्शक तत्वे,मुलभूत कर्तव्यामद्ये जी शिक्षणाची महती आहे ती पालकांना समजाऊन समाजामध्ये शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणे.शिक्षण घेतांना मुलगा-मुलगी हा भेदभाव न ठेवता दोघांनाही समान दर्जाचे शिक्षण घेता येने. ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निलेश नेवारे,प्रतीक ठाकरे,श्रीधर वाघाडे,अभिजित हेंबाडे,नितीन टाले यांनी अथक प्रयत्न केले.

Unlimited Reseller Hosting