Home मराठवाडा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिंचा विशेष सन्मान.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिंचा विशेष सन्मान.

35
0

शेख खाजा – नायगाव

नांदेड , दि. ०५ :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा नायगावच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिंचा सत्कार सोहळा दि.७ जानेवारी रोजी शासकिय विश्रामगृह शेळगाव रोड नायगाव येथे तहसीलदार सौ.सुरेखा नांदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सातत्याने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यंदाही तालुक्यातील विविध कामाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणाऱ्या अष्टपैलू व्यक्ती यांनी आपल्या कार्यकर्त्याने समाज मनावर आपल्या कार्याविषयी एक अगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे यात नायगाव चे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे,न.प.चे नगराध्यक्ष शरद भालेराव,उपनगराध्यक्ष विजय पा.चव्हाण,शरदचंद्र महाविद्यालयाचे प्रा.डॉ.के.हरिबाबु,प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख अनिस,एसबीआय चे मुख्य शाखा व्यवस्थापक पी.रविकुमार,पोलीस निरीक्षक राम पडवळ,सिनेअभिनेता रामेश्वर भालेराव,सपोनी के.एस. पठाण,मेडिकल असोशियन ग्रा.सचिव संजय मामीडवर, यासह डॉ.राजेश मिरकुटे.सौ.महानंदा गायकवाड,प्रताप पाटील सोमठाणकर या व्यक्तीचा विशेष सन्मान सदर संघाच्यावतीने ७ जानेवारी रोजी मंगळवारी शासकीय विश्रामगृह नायगाव येथे होणार असून या सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा तालुका नायगाव चे तालुकाध्यक्ष माधव पाटील चव्हाण,सल्लागार डॉ.शंकर गड्डमवार,उपाध्यक्ष शेख आरीफ,सचिव माधव बैलकवाड,कार्याध्यक्ष मधुकर जवळे,संघटक प्रल्हाद भंडारे,चंद्रकांत नरवाडे आदीजनानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Unlimited Reseller Hosting