Home महाराष्ट्र कामगार आयुक्तालय मुंबई येथे सावित्री फुले जयंती

कामगार आयुक्तालय मुंबई येथे सावित्री फुले जयंती

16
0

मुंबई – प्रतिनिधी

मुंबई , दि. 05 :- 03.01.2020 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जयंती निमित्त कामगार आयुक्तालय मुंबई येथे माननीय कामगार आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या हस्ते क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला, तसेच माननीय कामगार आयुक्त यांनी हुंडा प्रथे विरोधी लावलेल्या पोस्टर्सचे उदघाटन केले.

या कार्यक्रमास कामगार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अपर कामगार आयुक्त श्री काकतकर सर यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कामगार आयुक्त यांच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माननीय कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे यांनी प्रस्ताव नेत कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.
त्यात श्रीमती शोभा कोकिटकर समुपदेशक यांनी हुंडा प्रथेविरोधी व्याख्यान दिले.

तसेच सदर कार्यक्रमाच्या शेवटी कामगार विभाग येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी “मी आणि माझे कुटूंबिय हुंडा घेणार नाही,आणि हुंडा देणार नाही.
तसेच हुंडा घेणाऱ्या व देणाऱ्यांना साथ देणार नाही अशी शपथ घेतली”.