Home यवतमाळ बँकेच्या खात्यातील पैश्यांचा बँक मॅनेजरनेच गैरव्यवहार केल्याची तक्रार.

बँकेच्या खात्यातील पैश्यांचा बँक मॅनेजरनेच गैरव्यवहार केल्याची तक्रार.

227
पारवा भारतीय स्टेट बँकेतील प्रकार
———————————-
खातेदार रोशनी जैस्वाल यांची क्षेत्रीय प्रबंधकाडे अपहाराची लेखी तक्रार
———————————–
घाटंजी तालुका (प्रतिनिधी) तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा पारवा येथे मे.ताराबाई रामकिसनलाल जैस्वाल पेट्रोलियम पारवा या नावाने चालू खाते असून याच नावाने दुसरे खाते ई.डी.एफ.एस. कर्ज खाते आहे. यात आर्थिक परिस्थिती ढासळ्याने सदर ई.डी.एफ.एस. खाते थकीत झाले होते. त्यानंतर पैश्यांचा भरणा केला तसेच बँकेने २४ जुलै २०२५ रोजी फिक्स डिपॉसिट मोडून कर्ज खाते मध्ये जमा केले. त्यानंतर २४२५१५९. ९७ रुपये एवढी रक्कम बाकी होती. असे तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. यात शाखा व्यवस्थापक सतीश भोसले यांनी बँकेचे पॅनल वरिल वकील यांचे मार्फत न्यायालयात १३८ एनआय ऍक्ट अंतर्गत दावा दाखल केला. सदर दावा तक्रारदार यांचे कडील बाकी रक्कम २४२५१५९. ९७ रुपयाचा आहे. सदर दाव्याकरिता शाखा व्यवस्थापक यांनी तक्रारदार यांचे खातेमधून २४ जुलै २०२५ रोजी ९३,००० हजार रुपये नांवे केले. यात दाव्याच्या रक्कमेबाबत तक्रारकर्त्याला शंका आल्याकारणाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता यात ८८,००० हजार रुपये कोर्ट फी या नावाने घेण्यात आल्याचे नमूद होते.यातच वैतागलेल्या तक्रारदारास वाटले की,प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने आयोजित ९ मे २०२६ च्या लोक न्यायालयात तडजोड करून सोडविल्यास ८८,००० हजार रुपये कोर्ट फी परत मिळेल या आशेने लोक न्यायालयात गेले. मात्र बँकेचे पॅनल वरिल वकीलामार्फत घाटंजी न्यायालयात १३८ एनआय ऍक्ट अंतर्गत दावा दाखल केला त्याकरिता कोर्ट फी ४९,६००रुपये एवढीच रक्कम न्यायालयात भरल्याचे निदर्शनास आले. यावरून पारवा शाखेचे व्यवस्थापक व बँकेचे पॅनल वरिल वकील यांनी संगनमतकरून माझी ३८,४०० रुपयाचा माझ्या खात्यातून अपहार केलेला आहे. असे तक्रारीत नमूद करीत शाखा व्यवस्थापकाने पदाचा दुरोपयोग करीत परस्पर कोणतीही शहनिशा न करता माझे कर्ज खातेला ९३,००० रुपये टाकले. या व्यवस्थापकाने व पॅनलवरील वकील यांनी ३८,४०० रुपयाचा अपहार करून सुद्धा मी विनाकारण व्याजाचा भरणा करत आहे. असे तक्रारीत नमूद करून यवतमाळ क्षेत्रीय प्रबंधक यांचे कडे तक्रादार रोशनी संदीप जैस्वाल यांनी लेखी तक्रार देवून दोषीवर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
सदर तक्रारीची दखल न घेता संबंधितावर कारवाई न झाल्यास आर. बी.आय. चे मा.लोकपाल यांचे कडे तक्रार करणार असल्याचे सुद्धा जैस्वाल यांनी तक्रारीतून नमूद केले असून माझ्या खात्यातील पैश्यांचा अपहार केल्याने बँक व्यवस्थापक सतिश भोसले व बँक पॅनल वरिल वकील यांचे विरोधात पारवा पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितल्या जात आहे.याबाबत पारवा शाखेचे बँक व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी मोबाईल फोनवरून प्रतिक्रिया देण्यास टाळले. हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.