Home महत्वाची बातमी ४ वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून प्रकरणी आणखी २ आरोपींना अटक…..

४ वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून प्रकरणी आणखी २ आरोपींना अटक…..

105

 

अमिन शाह

मेहकर दि.२४
मेहकर येथील चार वर्षांपूर्वी बेपत्ता (मिसिंग) असलेल्या एका व्यक्तीच्या खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात आता पोलीस तपासात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुकळी (ता. मेहकर) येथील विनोद आश्रुबा नवले (वय ३८ वर्ष) हे मागील चार वर्षांपासून बेपत्ता होते. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१/०४/२०२६ रोजी मेहकर ते मोळा रोडवरील जामगाव शिवारातील एका शेतातून विनोद नवले यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आरोपींनी त्यांचा कट रचून खून केला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत गाडून त्यावर सिमेंटचा कोबा केला होता.

या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी सुनील बाजीराव जाधव (वय ३९, रा. सुकळी) आणि सचिन ज्ञानेश्वर उगले (वय ३२, रा. मेहकर) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे केलेल्या विचारपुस आणि तपासातून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींची नावे समोर आली आहेत.
पवन रामचंद्र घेवंदे(वय २८, रा. महिला कॉलेज मागे, मेहकर; ह.मु. संभाजीनगर, चिखली).
अंकुश दत्तात्राय बोडखे(वय ३५, रा. जामगाव, ता. मेहकर).अशी आरोपींची नावे आहेत.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, या सर्व आरोपींनी मिळून कट रचला आणि विनोद नवले यांचा धारदार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जमिनीत पुरले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मृतदेह बाहेर काढताना उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, नायब तहसीलदार अजय पिंपरकर आणि वैद्यकीय अधिकारी अमित धांडे यांच्यासह पंच व नातेवाईक उपस्थित होते.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार हे करीत आहेत. या कामगिरीत सुखदेव गव्हाणे, प्रभाकर शिवनकर, लक्ष्मण कटक, मोहम्मद परसुवाले, केशव अवचार, ईब्राहीम परसुवाले, शिवाजी चिम आणि महिला पोलीस कर्मचारी आम्रपाली सरकटे व लक्ष्मी साखरे यांचा सहभाग होता.

मृतक

Previous articleझरी तालुक्यातील दुर्भा नदीपात्रात बोट व पोकलेने रेती उपसा….!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.