Home विदर्भ अमरीन परवीण यांचे नामांकन दाखल : हजारो मुस्लिम बहुजन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य...

अमरीन परवीण यांचे नामांकन दाखल : हजारो मुस्लिम बहुजन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन

210

आर्वी / वर्धा – नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नगर परिषद अध्यक्ष पदासाठी अमरीन परवीण यांनी हजारो मुस्लिम व बहुजन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले नामांकन दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या या मोठ्या रॅलीने शहरात लक्ष वेधून घेतले.

नामांकन दाखल करताना समाजसेवक महेफुज कुरेशी व रुपचंद टोपले यांनी अमरीन परवीण यांना जाहीर पाठिंबा दिला. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक मंडळी, महिलांचे मोठे प्रमाण व विविध समाजातील नागरिक या रॅलीत सहभागी झाले. याचबरोबर अमरीन परवीण यांना पाच पक्षांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच एक मुस्लिम महिला नगर परिषद अध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीत नवे समीकरण आकार घेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सामाजिक कार्य आणि महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या अमरीन परवीण यांच्या उमेदवारीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये या उमेदवारीमुळे स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.