Home यवतमाळ वणीच्या प्रभाग 8 व 9 मध्ये सट्टा – मटका – आयपीएलचा...

वणीच्या प्रभाग 8 व 9 मध्ये सट्टा – मटका – आयपीएलचा धंदा करणारे आता उतरत आहे नगर परिषद निवडणूकीच्या रिंगणात…

1125

वणी – जनतेचे घर उध्वस्त करणारे खरंच जनतेला देणार का न्याय?
पैश्याच्या भरोश्यावर निवडणूक जिंकण्याची भाषा वापरणारे उमेदवार जनतेला न्याय देणार?
वणी शहरात राजकारणाचे तापमान चढू लागले आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच, गल्लीपासून ते चौकापर्यंत निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरातील प्रत्येक चहाच्या टपरीवर, पानाच्या गाड्यावर आणि बाजारपेठेत सध्या चर्चेचा एकच विषय,“या वेळी कोण येणार मैदानात?”
वणी नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत हौसे नवसे गौसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताना दिसत आहे. वणी शहरातील प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. ज्यांना राजकारणाचा र सुद्धा समजत नाही ते सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये सट्टा – मटका – आयपीएलचा धंदा करणारे अवैद्य व्यवसायिक सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे त्यांच्या या सट्टा मटक्याचा धंद्यामुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आयपीएल मुळे अनेक युवक कर्जबाजारी झाले आणि काहींनी आत्महत्या सुद्धा केली त्यामुळे अवैध्य व्यवसाय करणारे खरंच जनतेला न्याय देणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अवैध्य व्यवसायिक पैशाच्या भरवशावर निवडणूक जिंकण्याची भाषा बोलत आहे. त्यामुळे जनतेने अशा उमेदवारांना नाकारून स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच निवडून द्यावे जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास होणार लाखो रुपये खर्च करून जो नगरसेवक होईल तो स्वतःचा विकास पहिले करणार की जनतेचा असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मतदारांनी अशा अवैध्य व्यवसायिकांना चांगलाच धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.