Home विदर्भ रस्त्यांच्या कामांमुळे धुळीचे लोट, ब्रह्मपुरी शहरातील नागरिकांचे  आरोग्य बिघडले.

रस्त्यांच्या कामांमुळे धुळीचे लोट, ब्रह्मपुरी शहरातील नागरिकांचे  आरोग्य बिघडले.

425

रुपेश देशमुख /ब्रह्मपुरी 

ब्रह्मपुरीत सुरू असलेल्या  रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा त्रास रस्त्याकडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा शिडकावा केला जात नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. याकडे महामार्ग व बांधकाम विभाग मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यामुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे. श्‍वसनांचे विकार होऊन यामुळे फुफ्पुसांना त्रास होणे, दमा होणे त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास होतो.

डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे यासारख्या अनेक समस्यांना नागरिकांना समोरे जावे लागते. आधीच  नगरपरिषद कर भरायचा आणि पुन्हा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जायचे, त्याच प्रमाणे मूलभूत सोयी सुविधांसाठी जर असा न्याय  नगरपरिषद कडून मिळत असेल तर  नगरपरिषद काय कामाची, इतकी वर्ष सत्तेत असणारे काय कामाचे अशी विचारणा करण्यात येत आहे.

 

 ख्रिस्तानंद चौक, ते नवेगाव मत्ता  या भागात ही परिस्थिती तीव्र असल्याचे यामुळे अचानक एखादे वाहन समोर आल्याने आणि वाहनचालकांच्या डोळ्यात ही धुळ गेल्याने मोठ्या परिणामांना समोरे जाण्याची शक्यता आहे.  नगरपरिषदने चौकाचौकात डांबरी रस्त्यावरील डोळ्यात जाणार्‍या धुलीकणांपासून वाहनचालकांना दिलासा द्यावा.

 

काम करण्याची इच्छाशक्ती हवी

 नगरपरिषदने धुलीकणांच्या प्रश्‍नावर आता तरी जागी होऊन ही समस्या प्राधान्याने सोडवावी, अशी मागणी आहे. रोज रस्त्याची साफसफाई आणि पाणी मारल्यास  धुलीकणाच्या प्रश्‍नावर सहज मात करता येईल, त्याचप्रमाणे धुळीमुळे बळावणार्‍या आजरांवर नियंत्रण मिळवता येईल. मात्र, यासाठी दांडगी इच्छाशक्तीची गरज आहे. ही इच्छाशक्ती नगरपरिषद  अथवा सत्ताधारी केव्हा दाखवतील, हा प्रश्‍न अधांतरीच आहे.

 

 

धुलीकणांनी वाहनचालक बेजार

दुचाकी वाहनचालकांना नगरपरिषदच्या सर्व मार्गांवर हा प्रकार सोसावा लागत असल्याने आता वाहनचालकांनी यासाठी तीव्र रोष व्यक्त केला आहे. डोळ्यात धुलीकण जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे असे आहे. असे असताना आणि हे सर्व  नगरपरिषदला समजत असतानाही नगरपरिषद  का शांत आहे, असा सवाल करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असणार्‍या मातीच्या, डांबराच्या कणांनी मानवी जीवनाचे आरोग्य खराब होत असून याचा परिणाम सत्ताधार्‍यांना भोगावा लागेल. आज वाहतुकीचा ब्रह्मपुरी  शहरात बोजवारा उडालेला असताना त्याचप्रमाणे  रस्त्याच्या समस्येत आता पुन्हा उडणार्‍या धुलीकणांची भर पडल्याने नगरपरिषद या जीवघेण्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

*सत्ताधारी करताहेत तरी काय*?

 

सत्ताधार्‍यांना दरवर्षी होणार्‍या समस्या दिसत नसतील, हे शक्यच नाही. नगरपरिषद कडून  जर ही समस्या सुटत नसेल तर सत्तेत असणार्‍यांनी यावर उपाययोजना का नाही केली, असा सवाल आता जनतेमधून नागरिकांकडून होत आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्था असताना आता धुलीकणांनी नागरिकांनी बेजार झाले आहेत. त्यांना आपली वाहने व्यवस्थित चालवता येत नसल्याने त्यांना विविध आजारांनाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. वाहनचालकांच्या या समस्येवर सत्ताधारी, नाहीतर नगरपरिषदने उपाय शोधावा, आणि उडणार्‍या धुलीकणांपासून मुक्तता द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.