Home यवतमाळ ४९ व्या राज्य स्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत लेखी संवाद ला सर्वोत्कृष्ट अंकाचे...

४९ व्या राज्य स्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत लेखी संवाद ला सर्वोत्कृष्ट अंकाचे पारितोषिक

264

यवतमाळ प्रतिनिधी – गेल्या एकतीस वर्षापासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या लेखी संवाद या दिवाळी अंकास राज्य स्तरावर आयोजित स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंकाचे पारितोषिक मिळाले आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सुधीर क्षीरसागर संपादक असलेल्या लेखी संवाद दिवाळी अंकास आवाजकार मधुकर पाटकर सर्वोत्कृष्ट विनोदी अंकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आम्ही डोंबिवली कर या अंकाची मनोरंजन कार का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक म्हणून निवड करण्यात आली आहेधुरु हाॅल ट्रस्ट व दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण होणार आहे.
स्पर्धेसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदूर, शिकागो सिंगापूर येथून एकूण १७३ दिवाळी अंक आले होते. दिवाळी अंक स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष आहे.
बुधवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धुरु हाॅल, दादर सार्वजनिक वाचनालय येथे कार्यक्रम होणार आहे. दैनिक पुढारी चे सल्लागार संपादक सचिन परब हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर कृत्रिम बुद्धिमत्ता (ए1) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर ३० वर्ष संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम आणि कार्यकारी मंडळाने यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील सूर्वे, दत्ता मालप यांनी काम पाहिले.