Home यवतमाळ जिल्हा परिषद‌चा भोंगळ कारभार शाळेला शिक्षकच नाही…!

जिल्हा परिषद‌चा भोंगळ कारभार शाळेला शिक्षकच नाही…!

324
अशोक जोगदंड
यवतमाळ – (ता. दारव्हा) कुंभारकिन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा क्र. १ मध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. शाळेत सध्या एकच शिक्षक असून, तेही महिन्याभरापासून आजारी असल्याने शाळेत उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले असून, पालक आणि गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळींनी मिळून गटशिक्षणाधिकारी यांना शाळेला कुलूप लावण्याच्या पस्थिती निर्माण झाली आहे अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे.
सध्या शाळेत फक्त एकच शिक्षक असून, त्यांच्या तब्येतीमुळे त्यांची उपस्थिती नाही. या शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे शिक्षण विभागाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत एक शिक्षक नियुक्त केले मात्र प्रशिक्षक शिक्षक १० फेब्रुवारी २०२५ रोजी आपली मुदत संपल्यामुळे शाळा सोडून गेले. यामुळे सध्या शाळेत कोणताही शिक्षक उपलब्ध नाही
यात सहामाही परीक्षा सुरू असताना शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क असून सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ हा कायदा आहे. ४ ऑगस्ट २००९ रोजी संसदेने पारित केला होता आणि १ एप्रिल २०१० रोजी लागु झाला मात्र आर्थिक दुर्बल असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जीवन रेखा जिल्हा परिषद ची शाळा असल्यामुळे सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कागदावरच राहिलेला दिसतो या उलट खाजगी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षका सह शिक्षण मिळतं मात्र ते आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने सर्वसामान्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळे शिवाय पर्याय नाही अधिकारी आणि राजकारण्यांची मुलं सर्व खाजगी शाळेत शिकतात त्यामुळे या शाळेकडे कोणाचेही लक्ष जात नाही
शाळेत शिक्षक नसल्यामुळे त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही. पालकवर्ग आणि गावकऱ्यांनी या परिस्थितीचा निषेध व्यक्त केला असून, शाळेतील मुलांचे भविष्य धोक्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून, शाळेसाठी तातडीने मुख्याध्यापक किंवा अन्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले आहे आणि शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरळीत करण्यासाठी शिक्षकांची तातडीने नियुक्ती होणे गरजेचे आहे. जर शिक्षक उपलब्ध झाले नाहीत, तर शाळेला कुलूप लावण्या शिवाय पर्याय राहणार नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता शिक्षण विभागाकडून तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
( बॉक्स )
सूत्रांच्या माहितीनुसार ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्ह्यात ११४७ पदे रिक्त असून दारव्हा तालुक्यात ३७७ पदे मंजूर आहेत तर ७५ रिक्त आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरते सोबत मुलांची देखील पटसंख्या दरवर्षी कमालीची कमी होत आहे त्यावर जिल्हा परिषद कोणतीही उपाययोजना करत नसून दुसरीकडे मात्र करोडो रुपये खर्चून नव्या वर्ग खोल्या बांधण्याचे काम मात्र जोरात सुरू आहे नागरिकांमध्ये चर्चा रंगी आहे की शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त नसतानाही नव्या खोल्याचे बांधकाम नेमके कोणाच्या फायद्यासाठी ?