Home विदर्भ जिल्हा शल्य चिकित्सक यांची तात्काळ बदली करण्यात यावी…

जिल्हा शल्य चिकित्सक यांची तात्काळ बदली करण्यात यावी…

256

विभागीय आयुक्ताकडे गुरुदेवची मागणी…

यवतमाळ –  जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील वाढत्या अनियमितता आणि बेजबाबदार कारभारावर जोरदार आवाज उठवत, आज काही स्थानिक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. या निवेदनात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये अनेक अनियमितता पाहायला मिळत आहेत.
विनापरवानगी सुरू असलेली खासगी रुग्णालये: जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये आवश्यक परवानग्या न घेताच सुरू आहेत,आग प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव: अनेक दवाखान्यांमध्ये कोणतेही योग्य आग प्रतिबंधक उपाय केलेले नाहीत, ज्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो,मनमानी फी आणि सुविधांचा अभाव: रुग्णांकडून मनमानी पद्धतीने जास्त फी आकारली जाते, परंतु आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत,अयोग्य वागणूक आणि दमदाटी: खासगी रुग्णालयांतील काही स्टाफ सदस्य रुग्णांच्या नातेवाईकांशी उर्मटपणे वागत असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी अतिरिक्त पैसे मागितले जात असल्याचे आरोप आहेत,अनावश्यक तपासण्या: काही रुग्णालये गरज नसतानाही रुग्णांना अनेक तपासण्या करायला लावतात. या तपासण्या ठराविक लॅबमध्येच कराव्या लागतात, जेथे आर्थिक फायद्याचा संबंध असतो,औषध विक्रीतील अनियमितता: रुग्णांना ठराविक मेडिकल स्टोअर्सवरूनच औषधे घेण्यास भाग पाडले जाते. मध्यंतरी जिल्हा शल्य चिकित्सकाचा केबिनचा घोळ पण जनतेसमोर आला होता,त्यानंतर जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालयाचे सोपासेट त्यांनी आपल्या घरी नेल्याचे निदर्शनास आले होते
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “जनतेचा उपयोग राजकीय नेते फक्त निवडणुकीपुरता करतात. निवडणुका झाल्यानंतर त्यांना सामान्य नागरिकांच्या समस्या आणि आरोग्याशी संबंधित अन्यायाविषयी काही देणेघेणे राहत नाही,” असे गुरुदेव यांनी सांगितले.
Bनिवेदनात असेही नमूद केले आहे की, या गंभीर तक्रारी असूनही प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. “प्रशासन सुस्त आणि डॉक्टर मस्त” अशी अवस्था असल्याची लोकांची भावना आहे.जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभाराची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी केली