Home विदर्भ नेहमी दारू पिऊन आईला मारझोड करणाऱ्या बापास मुलाने केले ठार

नेहमी दारू पिऊन आईला मारझोड करणाऱ्या बापास मुलाने केले ठार

108

मिरननाथ मंदिर मागील फुकट नगर मधील घटना…!

देवळी प्रतिनिधी

वर्धा – देवळी येथे मिरननाथ मंदिरच्या मागे फुकट नगर मध्ये राहणाऱ्या नारायण कुरुडे वय 55 वर्ष त्याचा मुलगा नामदेव नारायण कुरुडे वय 25 वर्ष यांनी यांन मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आपल्या जन्मदात्या बापाला काठीने मारहाण करून ठार केले.
नारायण कुरुडे हा निकामी व दारुडा असल्याचे कळते ते नेहमी दारू पिऊन पत्नी सरस्वती तिला नेहमी मारहाण शिवीगाळ करून त्रास देत असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार नारायण कुरुडे यांनी दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आपली पत्नी सरस्वतीला जोरदार मारहाण केली . ही माहिती मुलगा नामदेव कुरुडे याला कळतच त्याने रागाच्या भरामध्ये वडील नारायण यांच्या डोक्यावर लाकडी बल्लीने जोरदार प्रहार करून मारहाण केली. त्यामुळे नारायणचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती देवळी पोलिसांना करताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत्यू पडलेल्या नारायण चा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी त्याचा मृत्यू शरीर वर्धा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी भेट देऊन संबंधित घटनेचा आढावा घेतला. तसेच देवळी पोलिसांनी विविध कलमे अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार रवींद्र शिंदे व त्यांचे पोलीस पथक करीत आहे.
आरोपी नामदेव याचा शोध घेणे सुरू आहे .