Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर विश्वस्थांच्या वतीने आ. दुर्रानी यांचा सत्कार

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

परभणी / पाथरी , दि. १२ :- येथील साई जन्मभूमी साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटीच्या विकास आराखड्याला मान्यता दिल्यानंतर या महत्वाच्या कामी आ बाबाजानी दुर्रानी यांनी पाठपुरावा करून जवळपास शंभर कोटी रुपयांचा हा निधी मंजूर करून घेतल्या बद्दल श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरीच्या विश्वस्थ मंडळाने शनिवार ११ जानेवारी रोजी आ दुर्रानी यांच्या निवास स्थानी जाऊन सत्कार केला.
या वेळी पाथरी साईबाबा जन्मस्थान मंदिर श्रीसाई स्मारक समिती पाथरी चे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अतुल चौधरी, कोषाध्यक्ष सूर्यभान सांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी, प्रभाकर पाटील, बालाजी हादरे, पुजारी योगेश इनामदार विष्णू पाथरीकर, प्रताप आमले, अजय पाथरीकर ,अण्णा कांबळे यांनी श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने पाथरीचे लोकप्रिय लाडके कर्तबगार आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा हृद्य सत्कार केला. साईस्मारक समितीचे अध्यक्ष सिताराम धानू यांनी दूरध्वनीवरून आमदार बाबाजानी यांचे अभिनंदन करून आभार मानले.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!