Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

सरकारी काम सोडून वाशीम जिल्हात निवडणूक प्रचार करणारा तलाठी निलंबित

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०६ :- लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील तलाठी अनिल गरकल हे सरकारी काम सोडून चक्क वाशीम जिल्हातील जीला परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रचार रॅलीत प्रचार करताना आढळले होते अश्यातच वाशीम जिल्हातील रिसोड तालुक्यात निवडणूक निर्णाय अधिकारी म्हणून मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड काम पाहत आहेत त्यांना आपल्याच उप विभागातील कर्मचारी निवडणूक प्रचार करताना दिसून आला होता यावर त्यांनी संबंधित तालाठ्याला नोटीस बजावून २४ तासात म्हणणे मांडण्याची ताकीद दिली होती मात्र कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने आणि इतर गंभीर प्रकरण समोर आल्याने निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी पुढील आदेशा पर्यंत तलाठी अनिल गरकल यास निलंबित केले आहे.

मेहकर उप विभागातील लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे कार्यरत असणारे तलाठी अनिल गरकल यांच्या बद्दल अहवाल टिटवी येथील मंडळ अधिकारी यांना मागितला असता त्यांनी अहवालात स्पष्ट केले की संबंधित तलाठी हे वारंवार गैरहजर राहतात तर ते मुख्यालयी सुद्धा राहत नाही.कित्येक महत्वाच्या बैठकीत गैरहजर राहणे,विना परवाना गैरहजर राहणे,शासनाचे विहित वेळेत काम करण्या साठी दिलेली कामे मुदतीत पूर्ण न करणे असे कारस्थान असतांनाच दुसरीकडे वाशीम जिल्हातील रिसोड तालुक्यात असलेल्या ग्राम भरजहागीर येथील लोकांना भावनिक करून राजकीय फायद्या साठी रिसोड भरजहागीर हा रस्ता अडवला यावेळी पोलीस प्रशासन वेळेवर पोहचल्याने पुढील अनर्थ तळला असे आशयाचे एक पत्र रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिले होते एकीकडे शासकीय कर्मचाऱ्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्या साठी प्रयत्न केले पाहिजे मात्र संबंधित तलाठी त्याच्या विपरीत कृत्य करीत असल्याचे निर्दशनास आले तर दुसरीकडे संबंधित तालाठ्याला आपले म्हणणे मांडण्या साठी निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी वेळ दिला होता मात्र त्यांनी कोणतेही उत्तर सादर केले नाही यावर ६ जानेवारी रोजी निवडणूक निर्णायक अधिकारी गणेश राठोड यांनी संबंधित तलाठी याला पुढील आदेशा पर्यंत निलंबित केले या मुळे शासकीय कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!