Home विदर्भ उमरखेड शहरात  जुगार अड्डयावर धाड, “३८ आरोपींना अटक”

उमरखेड शहरात  जुगार अड्डयावर धाड, “३८ आरोपींना अटक”

128

४७ लाख ३४ हजार ९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त…

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, उमरखेड यांचे पथकाची कार्यवाही…

रवि माळवी

यवतमाळ , दि. २७ :- उमरखेड येथील सदानंद वार्ड येथील नितीन बंग यांच्या राहत्या घरी जुगार खेळवीत असतांना उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, उमरखेड यांच्या पथकाने धाड टाकून ३८ आरोपींना अटक करुन एकुण ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २५ जून रोजी केली.
दिनांक २५ जून रोजी सायंकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान उमरखेड येथील सदानंद वार्ड येथे नितीन बंग हा त्याचे राहते घरी पत्ता जुगार खेळवीत असल्याचे मिळालेल्या माहीतीवरुन पोलीस अधीक्षक, यवतमाळ एम.राज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली अनुराग जैन सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी पुसद अति.प्रभार उमरखेड सोबत रिडर पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, रेवन जागृत, पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयराज शुक्ला, प्रकाश चव्हाण, छगन चंदन, मोहन चाटे, वसीम शेख, सुनुस भतनासे, भावना पोहुरकर, अंबादास गवारे, नवनाथ कल्याण कर, दिपक तगरे, विशाल जाधव, विठ्ठल भंडारे, यांनी सदानंद वार्ड परिसरातील नितीन बंग यांचे राहते घरी जावून छापा टाकला असता एकुण ३८ आरोपी मिळून आले.
सदर जुगार खेळणा:या एकुण ३८ आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून त्यात नगदी ९ लाख ३८ हजार ९७० रुपये व ४ लाख २९ हजार रुपये किंमतीचे ६५ मोबाईल, ४ मोटार सायकल किंमत २ लाख २० हजार रुपयाच्या तसेच ३ चारचाकी वाहन किंमत ३० लाख रुपये किंमतीच्या व जुगार खेळण्यासाठी वापरात आलेले ईतर साहित्य किंमत १ लाख ४७ हजार रुपयाचे असा एकुण ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींचे गुन्हेगारी अभिलेख पडताळून प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली.
सदरील सर्व आरोपी विरुध्द पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४,५ सह कलम १८८,२६९,२७१,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास अनुराग जैन सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी पुसद अति. प्रभार उमरखेड उपविभागीय हे करीत आहे.