Home सोलापुर अक्कलकोट तहसीलदार मरोड यांचे खेड्यातील नागरिकांना आवाहन

अक्कलकोट तहसीलदार मरोड यांचे खेड्यातील नागरिकांना आवाहन

36
0

वागदरी / नागप्पा आष्टगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन सुरु असताना करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता अक्कलकोट तालुक्यातील मंगरूळ, करजगी, देवीकवठे, सुलरजवळगे, यासह सर्वच खेड्यात पाड्यात तहसीलदार अंजली मरोड यांनी स्वतः माईक वरून गावकऱ्यांना संचार बंदी व कोरोनाचा वाढता फटका याविषयी थोडक्यात पण महत्त्वाचे कॉन्फरन्सिंग करून वेळोवेळी संबोधित करत आहेत.

अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांच्या या माईक कॉन्फरन्स ने तालुक्यातील खेड्या पाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आहेत. या माईक च्या माध्यमातून तालुक्यातील संशयित करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन ची व्यवस्था ही करण्यात आल्याचे सांगितले असून, तालुक्यातील या तहसीलदारांच्या दौऱ्याने नागरिक आतिशय शिस्तप्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. या दौऱ्या दरम्यान, त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करु नका तसेच सोशल डिस्टनस्गिंचं पालन करा अशी सूचना केली याद्वारे करण्यात आली असून, लॉकडाउनदरम्यान लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याचं समर्थन केलं
आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.करोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी गावागावात समिती नेमली आहे. गावातील समिती देखील तहसीलदार यांच्या आदेशानुसार गावपातळीवर आतिशय कार्यतत्परतेने काम करत आहे.

Unlimited Reseller Hosting