Home महत्वाची बातमी विद्यर्थिनी सोबत शिक्षकाने केले अश्लील चाळे गावकऱ्यांनी शिक्षकास धुतले

विद्यर्थिनी सोबत शिक्षकाने केले अश्लील चाळे गावकऱ्यांनी शिक्षकास धुतले

9
0

गुन्हा दाखल

अमीन शाह

दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमीश दाखवून बळजबरीने एका शिक्षकाने विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. या प्रकरणी आज शनिवार १५ फेब्रुवारी ला बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी शिक्षकास ताब्यात घेतले असून अधिक तपास चालू आहे.
बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दुधगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जगजिवन देवीदास गवई हा शिक्षक गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. गावातील एक विद्यार्थीनी गतवर्षी दहावीच्या परिक्षेत अनुर्तीर्ण झाली होती. या विद्यार्थीनीला उत्तीर्ण करण्याचे अमीष दाखवत हा शिक्षक गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थीनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. शनिवार १५ फेब्रुवारी रोजी शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षीक परिक्षा सुरू असल्याने सदर विद्यार्थीनी शाळेत आली होती. ही संधी साधून गवई याने विद्यार्थीनीस परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या खोलीतून शाळेच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत एकांत ठिकाणी परिक्षेसाठी बसविले. खोलीचा दरवाजा आतून बंद करून या विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करत जबरदस्तीने विनयभंग केला. परंतू विद्यार्थीनीने यावेळी विरोध करून आरडा ओरड केली. यामुळे शाळेचे शिक्षक व इतर परिक्षार्थी विद्यार्थी आल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती गावकरयांना कळल्यावर शाळेत मोठी गर्दी झाली. यावेळी गावातील नागरीकांनी शिक्षकाला चोप देत ताब्यात घेतले. पोलीसांशी संपर्क साधून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. बोरी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक जगजीवन देवीदास गवई याच्यावर भादंवी कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड , सपोनी विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार संजय काळे तपास करत आहेत.