Home मराठवाडा मंठा पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला 2 हजाराची लाच घेताना पकडले…!

मंठा पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला 2 हजाराची लाच घेताना पकडले…!

31
0

घरकुल योजनेचा धनादेशा साठी मागितली होती लाच….!!

लक्ष्मीकांत राऊत / अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १४ :- मंठा पंचायत समितीचे लोकसेवक कंत्राटी ग्रामीण ग्रह अभियंता कृष्णा काशिनाथ भाकरे रा.खडकेशवर ता.अंबड यांनी एका लाभार्थ्यांला घरकुल योजनेचा चेक साठी 2 हजाराची मागणी केली होती.याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज दि 14 फेब्रुवारी रोजी भाकरे यांना लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की मंठा पंचायत समिती मधील कंत्राटी ग्रामीण ग्रह अभियंता काशिनाथ भाकरे वय 25 याला आज दुपारी पंचायत समिती रोडवर तक्रारदार कडून दोन हजाराची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.काशिनाथ भाकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे घरकुल योजनेचा चेक देण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली होती,तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.14 फेब्रुवारी रोजी मंठा ते पंचायत समिती रोडवर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला त्यात भाकरे हे पंचासमक्ष लाच स्वीकारताना अलगद जाळ्यात अडकले.त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत चे पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया,अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार लाचलुचपत विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे,पोलीस निरीक्षक एस एस शेख,कर्मचारी ज्ञानदेव जुम्बड, मनोहर खंडागळे,राम मते,अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत,शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, गणेश चेके गणेश बुजाडे, जावेद शेख,प्रवीण खंदारे व आरेफ शेख यांनी पार पाडली. लाच लुचपत पोलिसांनी तक्रारदार यांचे नाव मात्र प्रसिद्धीपत्रकात का दिले नाही हे मात्र कळू शकले नाही.

Unlimited Reseller Hosting