Home विदर्भ अंत्यविधीला जाण्यासाठी निघालेल्या दोघांचा मृत्यू

अंत्यविधीला जाण्यासाठी निघालेल्या दोघांचा मृत्यू

55
0

अमीन शाहकारंजा , दि. १४ :- कारंजा येथे अंत्यविधीला जात असता अपघाताची झाल्याची घटना घडली आहे. हिंगोलीहून कारंजाकडे जात असताना मंगरूळपीर ते मोझरी फाटा परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या खडतर कामामुळे पिकपअ गाडी आणि हिंगोलीकडून येणाऱ्या अ‍ॅपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी पहाटे चार वाजता सुमारास घडली .हिंगोली येथील नातेवाईकाकडे हसीना भुरान नवरंगाबादी (वय ३५) आणि पुरी हसन नंदावाले (वय ५२) हे आपल्या अ‍ॅपे रिक्षा (क्र. एमएच ३८ ,५४२१) मध्ये बसून जात असताना कारंजाहून मंगरूळपीरकडे येणाऱ्या पिकअप गाडी (क्र. एमएच ३७ जे १६७६)ने जोरदार धडक दिली. या अपघातात हसीना नवरंगाबादी या जागीच मृत झाल्या तर पुरी हसन नंदावाले हा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर पुरी नंदावाले याला रूग्णवाहिकेने अकोला येथील दवाखान्याला नेत असताना वाटेतच शेलुबाजार परिसरात त्यांचा मृत्यू झाला.
तर यामध्ये हसिना नवरंगाबादीचा मुलगा जमील भुरान नवरंगाबादी (वय २५) हा गंभीरपणे जखमी झाला असुन त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेने संपूर्ण कारंजा आणि मंगरूळपीर शहर हळहळले आहे. मंगरूळपीर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच या घटनेतील दोन्ही वाहनांना रस्त्याच्या बाजुला करून वाहतुक व्यवस्था सुरूळीत केली आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय आदिनाथ मोरेसह पो. काँ. संजय गोडसे करीत आहेत.