Home बुलडाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे राजमाता जिजाऊचे नाव लावून नामाधिकरण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे राजमाता जिजाऊचे नाव लावून नामाधिकरण

156

प्रा ,दिलीप नाईक्वाड 
बुलढाणा

मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची ओळखच राष्ट्रमाता जिजाऊमुळे महाराष्ट्रात आहे.दिनांक
१४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनतेस दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासकीय शिक्षणाच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याची मान्यता मिळालेली होती वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावरून जिल्ह्यात विविध मतमतांतरे होती परंतु राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला असून त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या त्यांनी आपल्या दूरदृष्टीने, संस्कारक्षम व्यक्तिमत्व व दृढ नेतृत्वाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली त्यांचे जीवन राष्ट्रप्रेम, त्याग,शौर्य,व लोककल्याणाच्या उच्च आदर्शांनी परिपूर्ण होते, समाजमनात त्यांचे स्थान अत्यंत पूजनीय असून स्त्रीशक्तीचे प्रेरणास्रोत मानल्या जातात, त्यांच्या कार्यामुळे समाजात नैतिक मूल्ये, कर्तव्यनिष्ठा व जनकल्याणाची भावना दूर झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा चे आमदार संजय गायकवाड, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातून अनेकांची या वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नामाधिकरण करून राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा अशी नामाधिकरण करणे बाबत मागणी होती, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वरील प्रमाणे मागणी केलेली होती बुलढाणा जिल्ह्यातील जनमानसांच्या भावनांचा आदर करून महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल २०२५ ला शासन निर्णय घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा नामाधिकरण करण्यास मान्यता दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातून जनमानसांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.