Home बुलडाणा बागी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल होणार ,!

बागी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल होणार ,!

150

 

 

शिवप्रेमींनी दिली बुलढाण्यात पहली तक्रार.

 

फिर्यादी म्हणून अँड सतीशचंद्र रोठेंनी नोंदविला एफआयआर.

अमिन शाह

बुलढाणा :
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रथम एफआयआर बुलढाण्यात दाखल करण्यात आली आहे.
शिवप्रेमींनी आज 28 एप्रिलला दुपारी एफआयआर नोंदवित तक्रार दाखल केली आहे. तसेच त्वरीत कारवाई करण्यासाठी आंदोलनात्मक इशारा देत धीरेंद्र शास्त्रींचे फोटो फाडून पायदळी तुडवीत निषेध सुद्धा व्यक्त केला आहे.

24 एप्रिल ला नागपूर येथे भारतमातेची मूर्ती प्रतिष्ठापना मंदिराच्या शिलालेख कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगून भाकड कथा तयार केली. या भाकड कथेला कोणताही ऐतिहासिक पुरावा दस्त आधार नाही. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी जाणीवपूर्वक सुनीयोजीत कटकारस्थान रचून छत्रपती शिवरायांचा अवमान केला. तथाकथित रामदास स्वामी छत्रपती शिवरायांचे गुरु होते. छत्रपती शिवराय त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले की मी आता खूप थकलो.माझ्याकडून राज्यकारभार सांभाळला जात नाही. असे म्हणत स्वतःच्या डोक्यातील स्वराज्याचा अभिमान असलेला मुकुट काढून रामदास स्वामींना राज्यकारभार चालवण्याची विनंती केली. ज्यामुळे अखिल विश्वातील शिवप्रेमींच्या भावना पायदळी तुडवल्या. असंख्य शिवप्रेमींनी देशभर आंदोलन उभे केले. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे, जातीय दंगल घडविणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, छत्रपती शिवरायांचा अवमान करून सामाजिक अशांतता निर्माण करणे, कायद्याला न जुमानणे यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी रीतसर एफ आय नोंदवीत तक्रार देण्यात दिली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशन चौकशी अधिकाऱ्यांनी सदर तक्रार स्वीकारली आहे. तर तक्रारीनुसार त्वरीत गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा देत धीरेद्र शास्त्रींचा फोटो फाडून पायदळी तुडवीत निषेधही यावेळी केला आहे.