Home यवतमाळ शिवरायांच्या स्वराज्यातील राजाश्रय परत मिळवायचा असेल तर कलावंतांनो संघटीत व्हा – ॲड.श्याम...

शिवरायांच्या स्वराज्यातील राजाश्रय परत मिळवायचा असेल तर कलावंतांनो संघटीत व्हा – ॲड.श्याम खंडारे

106
यवतमाळ –  दि.11 डिसेंबर 2025 रोजी धानोरा ,राळेगाव पंचक्रोशीतील गावखेडे,वाडे तांड्यामधे राहणा-या लोकांना प्रदिर्घ निरोगी आयूष्य लाभण्यासाठी आयएमसी ह्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाद्वारे प्रत्येक आजारावर प्रतिबंधात्मक ऊपाय व आयएमसी च्या औषधोपचाराने रोग कसे हमखास बरे करावेत ह्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला ऊपस्थित ग्रामस्थ तथा कलावंतांना संबोधीत करतांना ॲड.श्याम खंडारे ह्यांनी आपले मनोगत मांडले, कलावंतांना वर्तमान बदलावयाचा असेल आणि छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यातील मान मरातब व राजाश्रय परत मिळवायचा असेल तर संघटीत व्हा,वंदनीय तूकडोजी महारांजापासून तर विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांपर्यत सर्वानी संघटीत होण्याची शिकवण दिली,त्यांच्या शिकवणूकीचे अनूसरण केले तरच आपण आपले, आपल्या कूटूंबासह समाजाचे व देशाचे भविष्य बदलवू शकतो,माणसाची बिघडत गेलेली
नियत व विकृती बदलवून नितीवान मणूष्य व समाज घडविण्याची ताकद फक्त कलावंतामधे आहे ,आणि त्यामूळे देशातील शेतक-यानंतर कलावंत हा देशाचा खरा पोशिंदा आहे.
कलावंत जगला पाहीजे त्यांचे आर्थीक सक्षमीकरण झाले पाहीजे ह्यासाठी राष्ट्रसंत तूकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र प्रामाणिक निस्वार्थ सेवाकार्य करीत आहेत त्यांना आपली ताकद द्या असे आवाहन केले.ह्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश मडावी,कार्याध्यक्ष सूधीर भाऊ चौधरी ह्यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे आयोजन व संचालन समितीचे राज्य महासचीव गंगाधरजी घोटेकर ह्यांनी केले.व आभार डाॅ संदिप सूरकर ह्यांनी मानले.