रेमंड युको डेनिम प्रा. ली., यवतमाळ येथे दि. 11 डिसे. 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 129 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवसेवेत पुढाकार घेतला.
यवतमाळातील रेमंड युको डेनिम ली. हे उद्योगसंस्थान आपल्या शहरातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. सामाजिक दायित्व जपत संस्था दर चार महिन्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करत असून, या उपक्रमातून शहरातील शासकीय रुग्णालयातील थॅलेसेमिया, सिकलसेल, प्रसूती तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक रक्ताची पूर्तता करण्यात मोठी मदत होत आहे.
निस्वार्थ सेवा फाउंडेशन, एचडीएफसी बँक आणि रेमंड युको डेनिम प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन सीईओ समीर गरडे आणि डब्लू.डी नितीन श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये अनेक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रेमंड युको डेनिम तर्फे श्री. चांडक सर, बिपीन मोहने, सारंग ठाकरे, जयवीर राठोड, मयुर काळे, नीलेश कोरे, निलेश जगताप यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निस्वार्थ सेवा फाउंडेशनतर्फे परशुराम कडू, अनिकेत नवरे, ईश्वर ऎरके, आस्तेश गावंडे आणि संपूर्ण निस्वार्थ टीम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक तथा वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक अनिल पिसे सर यांनीही विशेष परिश्रम घेतले.
रक्तसंकलन कार्यासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे रक्तसंकलन पथक आणि रक्तपेढीतील समाजसेवक आशिष दहापुते यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले.