
संताजी जगनाडे महाराज यांनी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या सर्व अभंग स्वतःच्या हाताने लिहीले.
म्हणून त्यांना ‘तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक हे मानाचे स्थान मिळाले.तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराजांची अद्वितीय मैत्री होती.
तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांची मैत्री ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील सर्वात प्रेरणादायी आणि आदर्श मैत्री मानली जाते. ही केवळ दोन व्यक्तींची मैत्री नसून धर्म, समाजजागृती, वैचारिक क्रांती,ज्ञान आणि माणुसकी यांना एकत्र आणणारा पवित्र संगम होता.
*गुरु–शिष्य, पण त्याहूनही मोठी जिवलग मैत्री*
संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते, परंतु त्यांच्या नात्याची उंची त्यापेक्षा अधिक होती.
संत जगनाडे महाराज तुकाराम महाराजांबरोबर फिरून, कीर्तन करून, समाजजागृतीचे कार्य करीत.
तुकाराम महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यात संताजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
*समाजजागृतीचा वारसा वारकरी पंथ*
तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज हे दोघेही वारकरी संप्रदायाचे खरे वाहक होते.
वारकरी पंथ म्हणजे अन्याय, चुकीच्या परंपरा, जातिभेद, आणि अंधश्रद्धा यांना विरोध करणारा विचार.
दोघेही “माणूसकी हीच खरी भक्ती” हा संदेश लोकांना देत.
संताजी महाराज नेहमी म्हणत.
*”तुकाराम महाराज म्हणजे चालते-बोलते ज्ञान!”*
*‘तुकाराम गाथा’ लेखनाचा महान कार्य*
तुकाराम महाराज अकस्मात देहत्याग करून गंगातपतीला गेल्यानंतर त्यांच्या अभंगांचा खजिना हरवण्याची भीती निर्माण झाली. तसेच काही विरोधकांनी त्यांच्या अभंगांची पोथी नदीत फेकून दिली.
*या कठीण काळात:*
👉 संताजी जगनाडे महाराजांनी स्वतःच्या हाताने
तुकाराम महाराजांच्या मूळ अभंगांचे लेखन करून ‘गाथा’ जतन केली.
यामुळे त्यांना इतिहासात अत्यंत मानाचे स्थान मिळाले:
✨ *“तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक”*✨
*त्यांची मैत्री – समाजासाठी दीपस्तंभ*
एकाने ज्ञान दिले, दुसऱ्याने ते जतन केले.एकाने अभंग रचले, दुसऱ्याने ते लोकांपर्यंत पोहोचवले.
एकाने क्रांतीची वाट दाखवली, दुसऱ्याने ती वाट मजबूत केली.
त्यांची मैत्री आजही प्रेरणा देते की खरी मैत्री म्हणजे एकमेकांच्या विचारांना, कार्याला, आणि माणुसकीला आधार देणे.
जगदीश वांदीले सर
8788538544,9860690063











































