Home विदर्भ पोलीस बॉईज असोसिएशन गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी केदार कटारे यांची नियुक्ती

पोलीस बॉईज असोसिएशन गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी केदार कटारे यांची नियुक्ती

456

गोंदिया / प्रतिनिधी

केदार किशोर कटारे यांची ” पोलीस बॉईज असोसिएशन गोंदिया ” जिल्हाध्यक्ष पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सांगितले आहे.

केदार कटारे हे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून ते गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / होमगार्ड / सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून सतत कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन ” पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष ” श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केदार कटारे यांच्यावर ” गोंदिया जिल्हाध्यक्ष ” पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल केदार कटारे यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.