
अमिन शाह
सद्या सम्पूर्ण राज्यात पावसाने हा हा कार माजवला असून सगळी कड़े पानीच पाणी दिसत आहे यात नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्य हा जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतो, हे आपण अनेक प्रसंगात अनुभवलं आहे. असाच प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या सीना नदीकाठच्या दारफळ या गावात अनुभुवायला मिळाला. येथील एका मशिदीमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक सिकंदर सय्यद यांना सुरेश शिंदे नावाच्या व्यक्तीने वाचवलं आहे. सुरेश यांनी स्वत:च्या जिवाची बाजी लावून सय्यद यांचे प्राण वाचवले. यामुळे सुरेश शिंदे याचं सर्वत्र कौतुक केल जातं आहे.
सध्या माढ्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात, दुकानांत पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे. अशात दररोज मशिदीत झोपायला जाणारे अपंग सिकंदर सय्यद याच पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांचा गावातीलच सुरेश शिंदे यांनी जीव वाचवला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार या गावात मध्यरात्री मशिदीत पाणी शिरलं
सिकंदर सय्यद हे नेहमीप्रमाने काल मशिदीमधे झोपायला गेले. एवढा मोठा पूर येईल, याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. पण ते मशिदीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली. अंगाखाली पाणी आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी रेंगत रेंगत मशिदीचा दरवाजा उघडला. बाहेर आले. तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं त्यांना दिसलं. वेळ मध्यरात्रीची होती. त्यामुळे बाहेर पडणं अवघड होतं. त्यामुळे त्यांनी मशिदीत आसरा घेण्याचं ठरवलं.मात्र पुराच्या पाण्याने चोहि कडून मशिदिला वेळा घातला पाहता पाहता अपंग असलेल्या सिकन्दर यांचा सम्पूर्ण शरीर पाण्यात बूड़त होता आश्यताच त्यांनी ओरड़न्यास सुरुवात केली मात्र मध्यरात्रिची वेळ असल्याने त्यांचा आवाज लोका पर्यंत पहोचला नव्हता मात्र याच वेळी मस्जिद जवळच राहत असलेले सुरेश शिंदे यांना जाग आली त्यांच्या कानावर सिकन्दर यांचा आवाज गेला असता थोड़ा ही वेळ न लावता आपल्या जीवाची परवा न करता सुरेश शिंदे यांनी मस्जिद मध्ये धाव घेऊन बूड़त असलेल्या सिकन्दर यांना कडेवर उचलून मस्जिद बाहैर सुरक्षित आनले व त्यांचा जीव वाचवलं या मुळे सर्व समाजातील गावक्रयांनी शिंदे यांनि दाखवलेल्या धाड़साची प्रशंसा केली आहे ,











































