Home यवतमाळ त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची राळेगाव “पत्रकार संरक्षण समिती”ची मागणी

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची राळेगाव “पत्रकार संरक्षण समिती”ची मागणी

329

राळेगाव:-आज दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले, त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, पत्रकार संरक्षण समिती राळेगावच्या वतीने जाहीर निषेध केला,या हल्ल्यातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.२० सप्टेंबर २०२५ रोजी ‘झी २४ तास’चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस धोरण जाहीर करावे आणि प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संरक्षणासाठी विशेष सेल स्थापन करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या,समाजातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकारितेमुळे होत असते. मात्र अलीकडच्या काळात पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे.या अमानुष घटनेचा आम्ही पत्रकार संरक्षण समिती संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व जिल्हा सहसचिव कविताताई धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समिती संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. पत्रकारांवर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या पायावर आघात करण्यासारखे आहे. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरातील कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही.यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा सहसचिव कविता धुर्वे,तालुका उपाध्यक्ष कैलास कोडापे,सचिव जितेंद्र खोडे,नरेश राऊत,लोकेश दिवे उपस्थित होते.