Home यवतमाळ अर्बन बँकेच्या नामधारी अध्यक्षाचा सावकारी व्यवसाय फोफावला…!

अर्बन बँकेच्या नामधारी अध्यक्षाचा सावकारी व्यवसाय फोफावला…!

898

लवकरच होणार पर्दाफाश – ‘पोलिसवाला’चा मोठा खुलासा

यवतमाळ – एका अर्बन बँकेच्या नामधारी अध्यक्षाचा सावकारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सावकाराने अनेक नागरिकांच्या जमिनी, प्लॉट, फ्लॅट आणि अन्य मालमत्ता गहाण ठेवून मोठ्या प्रमाणावर सावकारी सुरू केली आहे.

गुप्त माहितीनुसार, या अध्यक्षाच्या सावकारी जाळ्यात अनेक लोक अडकले असून, त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. विशेष म्हणजे, या सावकारी व्यवहारासाठी मोठ्या संख्येने एजंट कार्यरत आहेत, जे शहरभर कर्ज वाटपाच्या नावाखाली लोकांना या जाळ्यात ओढत आहेत.

अलिशान जीवनशैली आणि बँकेच्या माध्यमातून सावकारीचा डाव

सदर अध्यक्षाकडे आलिशान फ्लॅट्स, अनेक प्लॉट्स, महागड्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. बँकेच्या पदाचा गैरवापर करत सावकारी व्यवसाय वाढवला जात असल्याची चर्चा शहरभर आहे.

लवकरच होणार मोठा खुलासा!

‘पोलिस वाला’च्या विशेष तपासात लवकरच या सावकारी नेटवर्कचा पर्दाफाश होणार आहे. याप्रकरणी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाचत राहा ‘पोलिसवाला’ – लवकरच आणखी मोठे खुलासे…!