Home यवतमाळ एटीएम कार्ड अदलाबदल करुन बँकेच्या खात्या मधुन पैसे काढणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात…!

एटीएम कार्ड अदलाबदल करुन बँकेच्या खात्या मधुन पैसे काढणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात…!

418

अशोक जोगदंड

Yavatmal – ता.दारव्हा : एटीएम कार्ड अदलाबदल करुन बँकेच्या खात्या मधुन पैसे काढणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात टोळीचे कनेक्शन आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात
दारव्हा तालुक्यातील हरु येथील तुळशीदास भानुदास गावंडे हे २५ जानेवारी रोजी त्याचे खात्या मधुन पैसे काढणे करीता दारव्हा येथे एसबीआय बँकचे एटीएम मध्ये गेले असता ए.टी.एम मधुन पैसे काढत असतांना त्याचे ए.टी.एम कार्ड एक दोन वेळा प्रयत्न करुन सुध्दा पैसे निघत नसल्याने तिथे उभा असलेला अनोळखी ईसमाने मदतीच्या बहाण्याने. ए.टी.एम कार्डची हेरा फेरी करुन तुळशीदास गावंडे यांना दुसरे ए.टी.एम कार्ड परत दिले. त्यानंतर फिर्यादीच्या बॅक खात्यामधुन आरोपीने विविध ठिकाणावरुन १ लाख १५ हजार रुपये विड्रॉल केल्याचे लक्षात येताच गावंडे यांनी दारव्हा पोलीस स्टेशन गाठले.

तुळशीदास भानुदास गावंडे रा. हरु यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन दारव्हा येथे अप क्रमांक ५९/२०२५ कलम ३१८ (४) भा.न्या. 1. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अशाच घटना जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी घडल्याच्या पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निदर्शनास येताच सादर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व अधिनस्त पथकातील अधिकारी यांना दिलेल्या सूचनेवरून पथक आरोपीच्या शोधासाठी आंध्रप्रदेश व कर्नाटकात गेले असता कारवाईतून आरोपींना अटक करण्यात आली आरोपीचे नाव मोहन्ना व्यंकटरमण चिंताला, वय ३० वर्ष, रा. राजीव नगर कॉलनी पिलेरु जि अनामया आंध्रप्रदेश, कृष्ण मल्लप्पा भिमनळीकर, वय ३० वर्ष, रा. रतनपुर ता चिंतापुर जि गुलबर्ग आंध्रप्रदेश ह.मु. रेड्डी लेआउट बैंग्लोर कर्नाटक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

असुन पोलिसांनी दोन्ही आरोपीच्या ताब्यातुन गुन्हयातील फसवणुकीची रक्कम १ लाख २० हजार रुपये व गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक के. ए. ३२ डी ५८८१ किंमत ५ लाख रु व मोबाईल किंमत ५ हजार असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. तर मुख्य सुत्रधार फरार असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहे. एस. कृष्णमुर्ती, रा. कोकंणती क्रॉस बाला समुद्रम जि अंतपुर ह.मु. पदमावती नगर तिरुपती आंध्रप्रदेश असे फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी तपासा करीता पोलीस स्टेशन दारव्हा यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा येथील अधिकारी करीत आहे जिलह्यातील अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असुन यांचेवर इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारचे १० ते १२ गुन्हे नोंद आहेत.