Home यवतमाळ शिव जयंतीनिमित्त छत्रपती महोत्सवाचे भव्य आयोजन

शिव जयंतीनिमित्त छत्रपती महोत्सवाचे भव्य आयोजन

242

यवतमाळ,15 फेब्रुवारी – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य “छत्रपती महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 17 ते 19 आणि 23, 24 फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, गार्डन रोड, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असून,अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड (मराठा सेवा संघ) असतील.प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मदन येरावार उपस्थित राहतील.18 फेब्रुवारीला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक समन्वय व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर तृषार उमाळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्या भावनाताई गवळी असतील,तर प्रमुख पाहुणे म्हणून जीवन पाटील (संचालक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) उपस्थित राहणार आहेत.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, खासदार संजयभाऊ देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जि.प. सीईओ मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मोटारसायकल रॅली, दुपारी 3 वाजता भव्य ‘आदर्श शोभायात्रा’ आणि सायंकाळी 8.30 वाजता मार्गदर्शन व बक्षीस वितरण (अध्यक्ष: माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे) होणार आहे.
या महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना युवा पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, आरोग्य सेवा पुरस्कार, महिला पुरस्कार, सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासोबतच शिव सामान्य ज्ञान स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा, शिवरत्न गायन स्पर्धा, रील्स स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, कराटे स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शिव मॅराथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विशेष कार्यक्रमांत 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा जयंती निमित्त अक्षयपाल महाराजांचे प्रबोधनपर कीर्तन संत गाडगे महाराज चौक, वाघापूर, यवतमाळ येथे होणार आहे. तसेच, 24 फेब्रुवारीला छत्रपती राजाराम महाराज जयंती अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
या ऐतिहासिक महोत्सवात सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने स्वागताध्यक्ष मा. मनीष पाटील, प्रा. सुनील कुडू, ज्ञानेश्वर गायकवाड, शशिकांत खडसे, प्रा. प्रविण भोयर, प्रा. प्रविण देशमुख, अंकुश वानखडे, विवेक गावंडे, नितीन मिर्झापुरे, कॉम्रेड सचिन मनवर, अजय गावंडे, प्रद्युम्न जवळेकर, किशोर चव्हाण, निशा बुटले, आशाताई काळे, वैशाली सवाई, अर्चना देशमुख, संगीता होनाडे, वैशाली कडू, पुंडलीक बुटले, प्रा. पंढरी पाठे, जयश्री देशमुख, मयुरी देशमुख, प्रा. प्रशांत कराळे, योगीराज अरसोड, प्रा. डॉ. प्रदीप राऊत, उदय सरताबे, प्रा. घनश्याम दरणे, पंकज इंगळे, गौरव धवस, जितेंद्र सातपुते, राजू जॉन, उल्हास रणनवरे, सचिन येवले, संजय कोल्हे, सूरज खोब्रागडे, नितीन काळे आदींनी केले आहे.