Home यवतमाळ महापेक्स – २०२५ च्या अनुषंगाने ई-बायसिकल यात्रेचे यवतमाळात उत्स्फूर्त स्वागत…

महापेक्स – २०२५ च्या अनुषंगाने ई-बायसिकल यात्रेचे यवतमाळात उत्स्फूर्त स्वागत…

200

यवतमाळ दि.३ जानेवारी २०२५-

भारतीय डाक विभागाचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कल चे चीफ पोस्टमास्टर जनरल यांचे मार्गदर्शनात राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शन महापेक्स 2025 दि. २२ ते २५ जानेवारी दरम्यान “वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई” येथे आयोजित आहे.

या उपक्रमाच्या जनजागृती करीता “सेवाग्राम एक्सप्रेस” आणि “रायगड एक्सप्रेस” या नावाने डाक विभागाच्या दोन “ई बायसिकल” चमू राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करीत आहे. यापैकी “सेवाग्राम एक्सप्रेस” या चमूच्या दौऱ्याची सुरवात दि.०३.०१.२०२५ रोजी सेवाग्राम वर्धा येथून करण्यात आली. डॉ. वसुंधरा गुल्हाणे, निदेशक डाकसेवा, नागपुर परिक्षेत्र, नागपुर यांनी हिरवी झेंडी दाखवून या “ई” बायसिकल यात्रेचा शुभारंभ केला.

या “ई बायसिकल चमूचे यवतमाळ जिल्हयात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

सेवाग्राम येथून निघालेल्या या चमूचे कळंब येथे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी कळंब उपडाकघराचे कर्मचारी सायकल सह या रॅलीत सहभागी झाले. या वेळी यवतमाळ जिल्ह्याची परंपरा असलेले “आदिवासी कला-नृत्य पथक” या रॅलीत सहभागी होते. त्यानंतर ही रॅली श्री चिंतामणी मंदिर कळंब येथे आयोजित डाक चौपल या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित झाली, यावेळी उपस्थित भान्तिंन्स या उपक्रमाबाबत तसेच डाक विभागाच्या विविध योजना नाकरिकोना आणि एक पेड माँ के नाम”, तसेच स्वच्छता संदेश याबाबत माहिती देण्यात आली.

यानंतर या चमूने चापर्डा येथील ध्यानभूमी येथे भेट देऊन उपक्रमाबाबत जनजागृती केली यानंतर ही चमू यवतमाळ येथे दाखल झाली तेंव्हा यवतमाळ येथील मुख्य डाकघर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी यवतमाळकर, डाक कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सोबत सायकलसह या रॅलीत सहभागी झाले. या वेळी बंजारा वेशभूषेतील कलावंतानी त्यांचे पारंपारिक स्वागत केले. या वेळी आयुर्वेद महावि‌द्यालयातर्फे आयुर्वेदाचे महत्व या विषयावर विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

यानंतर या चमूने आर्णी येथील बाबा कंबलपोश दरगाह येथे भेट दिली व तेथे आयोजित कार्यक्रमातून जनजागृती करीत उपस्थितांना डाक विभागाच्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती दिली तेथून ही सायकल यात्रा माहूरगड करिता रवाना झाली. हा दौरा पुढे नांदेड – परभणी – छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर नाशिक पालघर मार्गे मुंबई येथे दाखल होणार आहे.

या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेट देत स्थानिक नागरिक, विध्यार्थी संस्थाना भेटी देत सायकल रॅली द्वारे “फिट इंडिया” संदेशाचा प्रचार, स्वच्छता संदेश, डाक सेवा जनसेवे चा, देत डाक विभागाच्या विविध योजना व उपक्रमाचा – प्रचार प्रसार करणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये या सायकल रॅलीचे स्वागत विविध ठिकाणी “डाक चौपाल” कार्यक्रम आयोजित करून करण्यात आले आणि उपस्थित नागरिक व विध्यार्थ्यांना डाक विभागाच्या विविध योजना, उपक्रम व स्वच्छता संदेश, एक पेड माँ के नाम व महापेक्स -२०२५ उपक्रमाची माहिती दिली.
ह्या उपक्रमात यवतमाळ डाक विभागाचे अधिक्षक श्री गजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे डाककर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.