
साजिद खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करू ना देणाऱ्या पोलिसाला मारहाण प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर ,
अमीन शाह
अकोला येथील उमेदवार साजिद पठाण यांच्या विजया चा जल्लोष साजरा करू न देणाऱ्या पोलीस अंमलदार यांना धक्काबुक्की करुन मारहाण करीत शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आठही आरोपींना आज अकोला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी जमानत अर्ज न्यायालयात सादर केला होता. आठही आरोपींना न्यायलयाने जामीन मंजुर करण्यात आला.
23 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता अकोला पश्चिम मतदार संघात महाराष्ट्र विधानसभा मध्ये कॉग्रेस पक्षाचे उमेदवार साजिद पठाण यांच्या विजयी जल्लोष काही नागरीक करीत होते. दरम्यान टिळक मार्ग माळीपुरा परीसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अमलदार यांना त्यांचे कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून काही लोकांनी त्यांना मारहाण केली. मारहाण केल्याच्या आरोपावरून आठ आरोपींना पोलीसांनी 24 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. कलम ,132, 3 (5), 189 (2), 189 (3) (5), 191 (2), 190 बि.एन. एस. सहकलम 135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
या प्रकरणामध्ये आज अकोला न्यायालयात सर्व आठ आरोपींना हजर करण्यात आले. सर्व आरोपींतर्फे वकिलांनी जामिन अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मुख्य न्याय दंडाधिकारी अकोला यांनी रूपये 20,000 च्या जामिनावर सोडण्याचे आदेश केले.
सर्व आरोपीतर्फे ॲड. अयुब नौरंगाबादे, ॲड. अलिरजा खान, ॲड. इम्ररान कुरेशी, ॲड. अब्दुल शफिक, ॲड. सादातअली देशमुख, ॲड. मोहम्मद मुद्रसीर, ॲड. आमिर खान, ॲड. अहमद रजा खान यांनी बाजू मांडली.












































