Home यवतमाळ भाजी विक्रेत्यांच्या नफेखोरीत यवतमाळकरांचे पोषण हरविले जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी वाद सोडवावा गुरुदेव युवा...

भाजी विक्रेत्यांच्या नफेखोरीत यवतमाळकरांचे पोषण हरविले जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी वाद सोडवावा गुरुदेव युवा संघाची मागणी

13

यवतमाळ : किरकोळ आणि ठोक भाजीविक्रेत्यांचा नफेखोरीसाठी वाद सुरु आहे,अशातच भाजीपाला मिळत नसल्याने यवतमाळकरांच्या अन्नातील पोषण हरविले आहे,शेतकऱ्यांच्या भरवश्यावर आणखी किती नफा कमवाल,अशी संतप्त प्रतिक्रिया गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिली आहे.भाजीविक्रेत्यांनी तातडीने भाजीपाला उपलब्ध करून द्यावा,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा,अशी मागणी निवेदनातून केली आहे.

विठ्ठलवाडी येथील भाजी मंडईतून चिल्लर भाजीविक्री होता कामा नये,अशी अपेक्षा चिल्लर भाजीविक्रेत्यांची आहे तर यास ठोक विक्रेत्यांचा विरोध आहे.या दोघांच्या भांडणात मात्र यवतमाळकर जनता भरडली जात आहे.विशेष म्हणजे नफेखोरीवर कुणाचेही नियंत्रण नाही शेतकरी भाजीपाला पिकवून अल्पदरात तो ठोक विक्रेत्यांना दलालांच्या माध्यमातून विकतो तर काहीही न करता दलालांचे खिसे गरम होतात याहूनही गंभीर बाब म्हणजे किरकोळ भाजी विक्रेते आपल्या मनमर्जीने अव्वाच्या सव्वा दर आकारून भाजीतून नफा कमवितात.केवळ नफेखोरीसाठी सुरु असलेल्या या वादातून भाजी उपलब्ध होत नसल्याने याचा जाब गुरुदेव युवा संघाने जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना विचारला आहे.पालकमंत्री हे पद आहे की गंमत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मंत्र्यांच्या आदेशाचे पालन न करता शहरवासीयांना भेडसावणाऱ्या समस्येतून त्यांची सुटका केली पाहिजे,असे स्पष्ट मत गेडाम यांनी आपल्या निवेदनातून नोंदविले आहे.या नाट्यमय वादावर पडदा न टाकल्यास गुरुदेव युवा संघाकडून आपल्या पद्धतीने काम केले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.निवेदन देतेवेळी गुरुदेव युवा संघाचे शाखा उपाध्यक्ष भाऊराव वासनिक, नेवला, मंदा मानकर, जुहीचावला पवार, जगन,रितेश चौधरी,फैय्याज टक्कर, सामरी, सुहास कांबळे,मामा तकलीफचंद तसेच बाबुलाल उपस्थित होते.