Home पालघर धानोशी ग्रामपंचायत मध्ये पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांचा पाहणी दौरा

धानोशी ग्रामपंचायत मध्ये पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांचा पाहणी दौरा

107

जव्हार :-सोमनाथ टोकरे

जव्हार तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत धानोशी लोकनियुक्त सरपंच विष्णू पवार बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी व खोलीकरण रुंदीकरण करून दिन याकरिता खासदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच डोहरेपाडा येथील ग्रामस्थांना शेतीच्या कामासाठी पाण्यासाठी वणवण करावी लागते. शबरी सेवा समिती यांच्यामार्फत त्या बंदराचे बांधकाम केले होते परंतु अतिशय लहान बंदरा असल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण पाण्याची पातळी कमी होते. तसेच
२०१४ साली कै.खासदार चिंतामण वनगा साहेब यांनी आदर्श सांसद ग्रामपंचायत धानोशी घेतली होती.तेव्हा वनगा साहेबांनी वचन दिले होते कि भिक मागे तरी धानोशी ग्रामपंचायत पैकी डोहरेपाडा येथे पाझर तलाव (मातीचा बंधारा) बांधून देईन.त्या वेळेस पाझर तलाव बांधण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून पाझर तलाव बांधण्यासाठी माती परीक्षण सुद्धा झाले होते. परंतु काय झाले काही कळेना. कदाचित वनगा साहेब आज असते तर पाझर तलाव झाला असता. २०१४ पासून आम्ही पाठपुरावा करतोय शेवटी संस्थेमार्फत आम्ही सिमेंट बंधारे व पाईप लाईन करून ७० शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाणी पोहोचवले आहे.पंरतू बंधाऱ्याची उंची कमी असल्याने पाहिजे तेवढा पाणी साठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही शेती करता येत नाही.बारमाही शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी नीधीची आवश्यकता आहे. उंची वाढवण्यासाठी नीधीची उपलब्धता झाल्यास शेतकऱ्यांना बारमाही शेती करता येईल.आज धानोशी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात फुलशेती, भाजीपाला, फळबाग लागवड कूकूटपालन इत्यादी.मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी उपस्थित उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, शांताराम मोहडकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.