Home पालघर केशव घाटाळ जव्हार तालुक्यात सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत रंधा यांनी केले विशेष कौतुक…!

केशव घाटाळ जव्हार तालुक्यात सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत रंधा यांनी केले विशेष कौतुक…!

64

जव्हार :- सोमनाथ टोकरे

जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे पैकी ( मोख्या चापाडा ) गावचे रहिवासी कै.काशिनाथ नवसु घाटाळ यांचा चिरंजीव केशव काशिनाथ घाटाळ मोख्या चापाडा गावातील तरुण यांनी जोपासला आहे चित्रकलेचा छंद त्यांचे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण शासकीय माध्यम आश्रम शाळा गोंदे येथे झाले. व त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे आणि माझे वडील लहानपनी वडील निधन झाल्यामुळे माझ्या कुटूंव आर्थिक संकट आले. माझे बाबांना माझ्याकडून लहानपणापासूनच की माझ्या मुलाने चांगलं नाव कुठेतरी केले पाहिजे माझे बाबांची इच्छा होती. परंतु आज मला तिचा अभिमान वाटतो माझ्या चित्रकलाकलेने माझी लोकप्रियता वाढत असल्यामुळे माझ्या मनाला मला समाधान वाटतं की मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. आज माझे चित्रकला ची पेंटिंग, मोखाडा, जव्हार, वाडा, या भागात पेंटिंग चे काम करत असतो.माझे पुढील शिक्षण घेण्यासाठी माझे कुटुंबाची अत्यंत हलक्याची परिस्थिती असल्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही परंतु आज मी माझ्या पेंटिंग मुळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. प्रत्येकाने आपाल्या मध्येआवडीनिवडी छंद असतात परंतु आपण ते वेळीत ओळखले पाहिजेत. आणि कलेला वाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. रोजगाराच्या निमित्ताने भटकंती करावी लागत नाही स्थानिक पातळीवर रोजगार मिळाल्यामुळे मी समाधानी आहे. मी माझ्या घरी वास्तव करत असून त्या चित्रकलेची मला आवड आहे .क्रांतिकारक महापुरुषांचे प्रतिमा, जिल्हा परिषद शाळेमध्ये भिंतीवरील चित्र, लग्न समारंभासाठी गणपती बाप्पाच्या प्रतिमा, वारली पेंटिंग असे इत्यादी मी मोठ्या प्रमाणात पेंटिंग करीत आहे प्रतिमा अतिशय सुंदर प्रकारे रेखाटन करीत आहे. कुठल्याही प्रकारचे चित्रकलेचे शिक्षण न घेता. चित्रकलेचे शिक्षक यांच्यासोबत राहून मला माझी चित्रकलाची आवड निर्माण झाली. अतिशय सुंदर चित्र काढल्यास मला येतात. केशव काशिनाथ घाटाळ माझे ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे मधील माजी उपसभापती चंद्रकांत रंधा साहेब , उपसरपंच शंकर काशिनाथ मेढा , सरपंच वैशाली अशोक धोडी, पत्रकार सोमनाथ टोकरे, ग्राम पंचायत सदस्य यांनी विशेष कौतुक केले आणि भविष्यात केशव घाटाळ यांना सहकार्य करण्याचे चंद्रकांत रंधा यांनी बोलताना सांगितले.