Home मराठवाडा युवकांनी शेती व्यवसायातील आव्हाने स्विकारावीत -शीतल चव्हाण

युवकांनी शेती व्यवसायातील आव्हाने स्विकारावीत -शीतल चव्हाण

126

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेतीवर जास्तीत जास्त शेतकरी अवलंबून आहेत.त्यामुळे युवकांनी शेती व्यवसायातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत.राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव,सहिष्णुता,सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा.यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम राबविला जातो.त्यामुळे सक्षम भारत निर्माण होण्यास मदत होईल,असे प्रतिपादन आत्माच्या प्रकल्प संचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांनी केले.

जालना जिल्ह्यातील भाटेपुरी येथे आर.जी.बागडीया कला एस.बी. लाखोटीया वाणिज्य,आर.बेंनझी विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी सिनेट सदस्य लक्ष्मीकांत शिंदे,प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी,प्रा.डॉ.सुशांत देशमुख,प्रा.डॉ.अमोल खांडभराड,प्रा.प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाल्या की,युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषि संशोधन आणि हायटेक शेती करावी.संरक्षित शेती व्यवसाय स्वीकारावा.स्वतःचे मालक स्वतः च होण्याचा प्रयत्न तरुण-तरुणींनी करावा.तसेच महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये नवक्रांती घडवावी,असे सांगून विद्यार्थ्यांना शेतीच्या विविध योजना,लागवड,प्राथमिक,दुय्यम शेतमाल प्रक्रिया ते थेट विक्री शेतकरी गट स्थापन करून गट शेती करणे.हायटेक शेतीसाठी पोकरा योजनेतून पॉलिहाऊस,शेडनेट मधील उच्चतंत्र पीक पद्धतीचा अवलंब करावा,कमी पाण्यात हवामान आधारित पीक पद्धती मध्ये बदल करावा आदि विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.गणेश रोकडे,प्रा.मनोज महेर,प्रा.करण सातुरे,प्रा.डॉ.राजेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेंद्र सोनवणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गणेश रोकडे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.