Home यवतमाळ ढाणकी जि. प शाळेत मुख्याध्यापक रिक्त पद तात्काळ भरा, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ...

ढाणकी जि. प शाळेत मुख्याध्यापक रिक्त पद तात्काळ भरा, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ शाळेवर पाठवा अन्यथा आंदोलन करू

277

 

शेख तय्यब शेख अहेमद यांची निवेदनातून मागणी…!

उमरखेड – जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा ढाणकी ता. उमरखेड, उमरखेड तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली उर्दू शाळा आहे या शाळेत विद्यार्थी संख्या नुसार वर्ग 1 ते 8 करिता एकूण 14 शिक्षक मंजूर आहे त्यापैकी फक्त 11 शिक्षक कार्यरत आहे.
जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा ढाणकी ता:उमरखेड या शाळेत मुख्याध्यापकाचे पद अनेक वर्षोपासून रिक्त आहे, येथील सहा-शिक्षक मागील 4 वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे अशैक्षणिक कामांसाठी नियमांना डावलून व शैक्षणिक हितावर लक्ष न देता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान करून पाठविण्यात आले.
जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा ढाणकी ता:उमरखेड उमरखेड या शाळेत शिक्षक संख्या कमी असल्याने शिक्षक प्रतिनियुक्तीवर असल्याने व शाळेत नियमित मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थी संख्यावर फरक पडत आहे त्याच बरोबर विद्यार्थीचे मोठ्याप्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या पूर्वी प्रतिनियुक्तीवर पाठविलेले या शिक्षक ला परत मूळ शाळेत पाठविण्यात यावा व मुख्याध्यापक पद भरण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
अनेक वेळी मागणी करून ही मुख्याध्यापकाचे पद रिक्तच आहे व प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणीक नुकसान होत आहे
शाळेत मुख्याध्यापकाचे रिक्त पदावर नियुक्ती करावी व प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकला तात्काळ परत मूळ शाळेवर पाठविण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान आम्ही खपवून घेणार नाही व नाइलाजास्तव आंदोलन करावे लागणार, विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेता तात्काळ कार्यवाही अपेक्षित.