Home महाराष्ट्र नामदार संदिपान भुमरे ( कॅबिनेट मंञी ) यांचा सत्कार सोहळा संपन्न

नामदार संदिपान भुमरे ( कॅबिनेट मंञी ) यांचा सत्कार सोहळा संपन्न

79
0

रविंद्र गायकवाड

बिडकीन , दि. ०५ :- रोजी सकाळपासून ते आतापर्यंत नामदार संदिपान पा.भुमरे यांचा सत्काराचे व पेढे तुला चे आयोजन बिडकीन येथील शिवसैनिकांनी केले होते.निलजगाव फाटा ते शासकीय विश्रामगृह पर्यंत रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते.

बिडकीन येथील निलजगाव फाटा येथे येताच बिडकीन येथील २५१ किलो च्या मोठ्या पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.शासकीय विश्रामगृह येथे मा.ना.भुमरे साहेबांचे बिडकीन व बिडकीन परिसरातील वेगवेगळया खेड्यातील लोकांनी ना. भुमरे यांचा सत्कार करुन आपली भावना दर्शिवली.बिडकीन परिसरातील सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रम प्रसंगी मनोज पेरे,विकास गोर्डे,मधुकर सोकटकर,किरण गुजर,बाबासाहेब टेके,अशोक टेके,रमेश शिंदे,जयराम गायकवाड व सर्व ग्रा.पं.सदस्य,प्रतिष्ठित व्यक्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बिडकीन येथील कार्यक्रम प्रसंगी मा.ना.भुमरे यांनी आपण कॅबिनेट मंञी कसे झालो याबाबतची सर्व माहिती देवुन सर्व जनतेचे व ठाकरे सरकारचे आभार व्यक्त केले.