Home यवतमाळ ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास माजी सरन्यायाधीश भूषण...

ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती

127
यवतमाळ  – विद्या प्रसारक मंडळद्वारा संचालित स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ मध्ये एका ऐतिहासिक सोहळ्यात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी, दि. 2 मे 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजता, यवतमाळ येथील गोधनी मार्गावरील अमोलकचंद महाविद्यालयाच्या परिसरात हा सोहळा संपन्न होईल.
भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल किलोर, यवतमाळ जिल्ह्याच्या पालक न्यायाधीश न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच यवतमाळचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांचीही यावेळी सन्माननीय उपस्थिती असेल. तसेच या सोहळ्याला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, उच्च शिक्षण संचालक (पुणे) डॉ. शैलेंद्र देवळणकर, यवतमाळ वाशीम चे खासदार श्री. संजय देशमुख, बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य ॲड. आशिष देशमुख, यवतमाळचे आमदार श्री. बाळासाहेब मांगुळकर आणि यवतमाळच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रियदर्शिनी उईके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा भूषविणार आहेत. या प्रसंगी यवतमाळ शहरातील नामांकित निवडक वरिष्ट वकिलांचे तसेच महाविद्यालयातील निवडक माजी विद्यार्थी जे जिल्हा न्यायाधीश पदावर कार्यरत आहे यांचा सत्कार करण्याचा मानस आयोजाकांद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन सुरू आहे. या सोहळ्याला यवतमाळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, ज्येष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, आणि विद्या प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, कर्मचारीने केले आहे. पत्रकार परिषदला विद्या प्रसारक मंडळ चे संचालक माजी आमदार कीर्ती गांधी. किशोर बाबु दर्डा.आमदार बाळासाहेब मागूळकर डॉ. ललित निमोदिया ऍड प्रवीण जानी ऍड पंकज ओसवाल आदी उपस्थित होते.