Home यवतमाळ एका अधिकाऱ्याला दिली येरावार यांनी जिवे मारण्याची धमकी

एका अधिकाऱ्याला दिली येरावार यांनी जिवे मारण्याची धमकी

634
यवतमाळ – पुसद शहराच्या मध्यवस्तीत आलेल्या शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या 10 एकर जागेची कवडी – मोल खरेदी करण्यात आली आहे .
सदर या प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 अंतर्गत खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी सध्या सुरू आहे. याकरिता घाटंजी येथील सहायक निबंधक यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच चौकशी अहवाल आपल्या मर्जीचाच असावा, असा दबाव त्यांच्यावर आणला जात आहे. त्यासाठी यवतमाळ येथील अमोल येरावार व विजय भोपीसिंग चव्हाण पुसद यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सहायक निबंध कैलास खटारे यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक, यांच्याकडे दाखल केली आहे. पोलिसांकडे दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन जिनिंग प्रेसिंगच्या 100 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची विक्री प्रक्रिया करताना त्याला पुरेशी प्रसिद्धी देण्यात आली नाही. त्याकरिता ऑनलाइन टेंडरिंगही केलेले नाहीत. या प्रकरणात सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था म.रा.पुणे यांची दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी मालमत्ता विक्रीबाबत परवानगी घेतली मात्र ही संचालक प्रक्रिया राबविताना विलंब करण्यात आला. संस्थेच्या सर्व मंडळाला मुदतवाढ दिलेली असताना संचालक मंडळाने सदरचा व्यवहार केला. चौकशीत ही जागा आरसी प्लास्टो अँड प्रा. नागपूर यांनी घेतल्याचे आढळून आले. या फर्ममध्ये अमोल येरावार रा. यवतमाळ हे भागीदार आहेत. एकूणच या प्रकरणात तक्रारी झाल्याने त्याची चौकशी लावण्यात आली आहे.
एक अधिकारी म्हणून सहायक निबंधक कैलास खटारे यांची नियुक्ती करण्यात आली. खाटारे यांच्याकडून संपूर्ण व्यवहाराची चौकशी केली जात आहे. यातूनच कैलास खटारे यांना दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री अंदाजे 10:30 वाजता त्यांच्या यवतमाळ येथील घरी घेऊन अमोल येरावार यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.