Home विदर्भ ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच….!

ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच….!

437

रुपेश देशमुख ब्रह्मपुरी

ब्रह्मपुरी : आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. विलास विखार यांना उमेदवारी द्यावी, असा ठाम आग्रह पक्षातील एका प्रभावी गटाकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मते, विखार हे स्थानिक पातळीवर मजबूत कार्यकर्ते असून पक्षाला विजयाकडे नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. परंतु दुसऱ्या गटाकडून विखार यांच्या नावाला तीव्र विरोध होत असल्याने वातावरण अधिक तापले आहे.

विरोध करणाऱ्या गटाचा आरोप आहे की विखार यांची प्रतिमा सर्व घटकांत स्वीकारार्ह नसून पक्षात अंतर्गत नाराजी वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या पर्यायी उमेदवारावर विचार करावा, अशी मागणी हा गट नेतृत्वाकडे सातत्याने करत आहे.

दरम्यान, माजी आमदार अतुल देशकर यांनीही विखार यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध दर्शवला असून त्याचा परिणाम पक्षातील समीकरणांवर मोठा होताना दिसत आहे. देशकर यांचा विरोध उघडपणे समोर आल्याने उमेदवार निवडीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील बैठकींमध्ये तणावाचे वातावरण असून अंतिम उमेदवारीची घोषणा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे निवडणूक जवळ येत असताना पक्षांतर्गत कलह उफाळून येत असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.